Closed Gate of Agricultural Produce Market Committee. esakal
जळगाव

Jalgaon News : जळगाव बाजार समितीतील 5 कोटींचे व्यवहार ठप्प

Jalgaon News : सोमवारी सकाळी बाजार समितीमधील सर्व कर्मचारी, हमाल-मापारी संघटनेचे पदाधिकारी व सर्व संचालक मंडळाच्या सदस्यांनी आंदोलन केले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : राज्य शासनाने कृषी उत्पन्न बाजार समित्यांसंदर्भातील कायद्यात नुकताच बदल केला असून तो जाचक आहे.. तो रद्द करावा यासह अन्य मागण्यांसाठी राज्य बाजार समिती संघाच्या आवाहनानुसार जळगावसह जिल्ह्यातील १२ बाजार समित्यांनी सोमवारी (ता.२६) बंद पाळला.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व व्यवहार त्यामुळे ठप्प झाले होते. दिवसभरातील पाच कोटींहून अधिक उलाढाल ठप्प झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव प्रमोद काळे यांनी दिली. (Jalgaon 5 Crore transactions in Jalgaon Market Committee stalled )

समित्यांचे काम बंद

सोमवारी सकाळी बाजार समितीमधील सर्व कर्मचारी, हमाल-मापारी संघटनेचे पदाधिकारी व सर्व संचालक मंडळाच्या सदस्यांनी आंदोलन केले. या वेळी सभापती श्यामकांत सोनवणे, उपसभापती डॉ. पांडुरंग पाटील, यांच्यासह संचालक देखील सहभागी झाले.

बाजार समिती प्रशासनाकडून दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे बाजार समिती आवारात कोणत्याही मालाची आवक आज झाली नाही. काही भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी माल आणला, मात्र सकाळी बाजार समितीच्या आवाराच्या पुढे हा माल विक्री केला.

व्यापारी कायद्याच्या बाजूने

हमाल-मापारी, बाजार समिती कर्मचारी संघटनेकडून कायद्यास विरोध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला. मात्र, व्यापारी वर्गाने या सुधारित कायद्याला समर्थन दर्शविले आहे.

जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाचे उपाध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी ज्या ठिकाणी बाजार समितीचे काही घेणंदेणं नाही, तसेच बाजार समिती काहीही सुविधा पुरवीत नाही, त्या ठिकाणांहून सुद्धा बाजार समितीकडून कर आकारला जात नाही.

तसेच बाजार समितीची जागा नाही, तसेच ज्या ठिकाणी शेतकऱ्यांकडून माल देखील घेतला नसल्याने शेतकऱ्यांची फसवणुकीचा सबंध येत नाही. अशा ठिकाणी बाजार समित्यांच्या नियमनाची गरज काय..? ही मागणी व्यापारी वर्गाकडून केली जात होती. शासनाने हे विधेयक मांडल्यामुळे व्यापाऱ्यांना कोणताही त्रास नाही, त्यामुळे या विधेयकाला व्यापाऱ्यांचा पाठिंबा असल्याचे मत व्यक्त केले.

पाच कोटींचे व्यवहार ठप्प

जळगाव बाजार समिती जळगाव जिल्ह्यातील धान्य व भाजीपाल्याची मुख्य बाजारपेठ आहे. आज दिवसभरात हे सर्व व्यवहार बंद होते. त्यामुळे या बाजार समितीची दैनंदिन ४ ते ५ कोटींची उलाढाल ठप्प झाल्याचा दावा समितीने केला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवारी भाजीपाल्याचे लिलाव होणार नसल्याने शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी आणला नव्हता. त्यामुळे जळगाव शहरातील किरकोळ विक्रेत्यांकडेही पुरेसा भाजीपाला नसल्याने शहरात भाजीपाल्याची टंचाई दिसून आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Singer Nisar Vaynad : उदित नारायण यांची ‘कार्बन कॉपी’! प्रसिद्ध गायकाचे वयाच्या ४४व्या वर्षी निधन; दुबईत घेतला अखेरचा श्वास

Mohan Bhagwat: ब्रिटनमधील हिंदूंची ब्रिटन हीच कर्मभूमी: मोहन भागवत; कर्मभूमीशी प्रतारणा करण्यास हिंदुत्व सांगत नाही

Baba Amte Anandwan: बाबा आमटेंचे ‘आनंद निकेतन’ हस्तांतराच्या वाटेवर, पुनर्बांधणीचा खर्च पेलवेना, आनंदवनातील कॉलेज अडचणीत

Motivational Story: मुलींच्या शिक्षणासाठी अनवाणी धावल्या; रमाबाईंच्या जिद्दीची सरन्यायाधीशांनी घेतली दखल, संघर्षाची प्रेरणादायी कहाणी..

तुम्हाला मूल्यमापन करण्याची गरज आहे का?

SCROLL FOR NEXT