

Mumbai Police officer suspended after alleged threat to students
ESakal
मुंबई : एका मुंबई पोलिसाकडून काही मुलांना धमकी देत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 'पुन्हा दिसलात तर ५० ग्राम पावडर खिशात टाकेल, पूर्ण आयुष्य वाया जाईल आणि जामीनही मिळणार नाही' अशी गंभीर धमकी एका पोलिसाने काही मुलांना दिली. मुंबई पोलिसांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.