Jalgaon Crime News : रावेर पोलिस ठाण्याच्या पोलिसांकडून चोरीस गेलेले ५० मोबाईल संबंधितांना पालकमंत्री व उपस्थितांच्या हस्ते देण्यात आले. तसेच पोलिसांचा गौरव करण्यात आला. रावेर पोलिस ठाणे हद्दीत गहाळ झालेले ५० मोबाईल रावेर पोलिसांनी मूळ मालकांच्या स्वाधीन केले. या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील तीन वर्षांपासून आजपर्यंत बरेच मोबाईल गहाळ झाल्याबाबत मोबाईलधारकांनी तक्रारी केल्या होत्या. (50 stolen mobile returned to original owner by police )
याबाबत पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी गहाळ झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याबाबत सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलिसांनी मोबाईलधारकांनी पुरविलेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेची तांत्रिक विश्लेषणासाठी मदत घेऊन ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे ५० मोबाईल हस्तगत करून मूळ मोबाईल धारकांना गुरुवारी (ता. २५) पालकमंत्री गुलाबराव पाटील.
ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार मंगेश चव्हाण, आमदार किशोर पाटील, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी वेवातेलु केजो, अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी अन्नपूर्णांसिह, पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्याहस्ते मोबाईल नागरिकांना परत करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.