At present, water is being released through six gates of the dam. esakal
जळगाव

Jalgaon Girna Dam : गिरणा धरणाचे 6 दरवाजे उघडले; ‘नाग्यासाका’च्या पाण्याची आवक वाढली

Girna Dam : गिरणा धरणाच्या वरच्या भागात पुन्हा पाऊस सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : गिरणा धरणाच्या वरच्या भागात पुन्हा पाऊस सुरू असल्याने धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. विशेषतः नाग्यासाका धरण ‘ओव्हर फ्लो’ झाले असून, त्याचे पाणी गिरणा धरणात येत आहे. धरण यापूर्वीच शंभर टक्के भरल्यामुळे शुक्रवारी (ता. ११) दुपारी एकला धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले. चार दरवाजे ६० सेंटिमीटर, तर दोन दरवाजे ३० सेंटिमीटरने उघडले आहेत. त्यातून सुमारे १२ हजार ३८० क्यूसेक पाण्याचा विसर्ग गिरणा नदीत सुरू आहे. ( 6 gates of Girna Dam were opened water inflow of Nagasaki increased )

यामुळे गिरणा नदी प्रवाहित झाली आहे. सकाळी सहाला गिरणा प्रकल्पातून एक हजार २३८ क्यूसेकने होणारा विसर्ग वाढवून दोन हजार ४७६ क्यूसेकने केला होता. धरणाचे दोन दरवाजे ३० सेंटिमीटरने उघडले होते. सकाळी आठला चार हजार ९५२ क्यूसेकवरून सात हजार ९२८ क्यूसेक पाणी सोडले. सध्या हाच विसर्ग १२ हजार ३८० क्यूसेक करण्यात आला आहे. त्यामुळे गिरणा नदीला चांगले पाणी आले आहे. (latest marathi news)

सर्व प्रकल्प भरले

सध्या हरणबारी, चणकापूर, ठेंगोडा या धरणांतून थोड्या फार प्रमाणात पाणी गिरणा नदीत येत असल्याचे गिरणा पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले. गिरणा धरण भागात आतापर्यंत सरासरी ६९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गिरणा प्रकल्पात पाण्याची आवक पाहता, विसर्ग कमी जास्त करण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात आले.

नदीपात्रात जाण्यास मज्जाव

गिरणा धरणातून नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असून, नदीला सध्या प्रचंड पाणी आले आहे. त्यामुळे नदीपात्रात जाण्यासाठी गिरणा पाटबंधारे विभागाने मज्जाव केला आहे. नदीच्या पाणी पातळीत केव्हाही वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता, सावधानता म्हणून नदीकाठच्या गावांना तशा सतर्कतेच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MNS Warning: "बाप बनण्याचा प्रयत्न करू नका, मेहता-बिहतांनी..." ; मिरा भाईंदर व्यापार्‍यांच्या बंद नंतर मनसेचा आक्रमक इशारा!

Amit Shah : अमित शहा यांचे पुण्यात आगमन; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

Latest Maharashtra News Updates : समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात, चौघांचा मृत्यू

Asian Hockey Cup: क्रीडा मंत्रालयाकडून पाकला हिरवा कंदील; भारतात खेळण्याची परवानगी

Kolhapur Police : कोल्हापुरातील गुंडगिरी संपवण्यासाठी एसपी अॅक्शन मोडवर, कुचकोरवी उर्फ एस. के. गॅंगच्या १७ जणांना केलं हद्दपार

SCROLL FOR NEXT