Anil Patil esakal
जळगाव

Jalgaon News: अमळनेर मतदार संघात 61 कोटींच्या रस्त्यांना मंजुरी : मंत्री अनिल पाटील; 5 ग्रामीण महत्त्वपूर्ण मार्गांचा समावेश

Jalgaon News : ५८ कोटी ९७ लाख निधीतून ही कामे होणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत टप्पा दोन संशोधन व विकास अंतर्गत जिल्ह्यातील रस्त्यांची दर्जोन आहेती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून, यात अमळनेर मतदारसंघातील ५ रस्त्यांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ५८ कोटी ९७ लाख निधीतून ही कामे होणार असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी दिली. (61 Crore roads approved in Amalner Constituency)

विशेष म्हणजे, या पाचही रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी देखील २ कोटी ८० लाख निधी मंजूर झाला असून, हे पाचही रस्ते ग्रामीण भागातील महत्त्वपूर्ण रस्ते असल्याने जनतेची मोठी सोय होणार आहे. मंत्री अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने अमळनेर मतदारसंघातील रस्त्यांसाठी एकापाठोपाठ निधी येत असल्याने नवीन रस्त्यांची मालिका साकारली जात आहे.

या रस्त्यांच्या मंजुरीबद्दल मंत्री पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत. (latest marathi news)

या रस्त्यांचा होणार विकास

मुंगसे-पातोंडा-सोनखेडी-निमझरी रस्ता, हेडावे-सुंदरपट्टी-सडावन रस्ता, रा.मा १५ ते देवळी-देवगाव-नगाव बुद्रुक रस्ता, कंकराज- भोकरबारी- शेळावे बुद्रुक रस्ता, सुमठाणे- वडगाव- बहादरपूर- पुनगाव- पारोळा रस्ता, असे रस्ते होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात वादळी पावसाचा इशारा; आज 'या' जिल्ह्यांत गारपीट होण्याची शक्यता

Gadchiroli News: रेकाॅर्डवरील शेवटच्या माओवाद्याला परतीची साद; लोकशाही मार्ग स्वीकारण्याचे आवाहन; डाव्या पक्षांच्या नेत्यांनी घेतली कुटुंबाची भेट

Donald Trump Speech: आता तुम्ही तुमचं बघा... ट्रम्पने केले हात वर, होर्मुझवरुन इतर देशांना दिला सल्ला! तेलाचा प्रश्न पेटणार

Kolhapur fire news : कोल्हापुरातील फुलेवाडी रिंगरोडवरील सुपर बाजारला भीषण आग; मोठे नुकसान

Akola News: दहा हजार रुपये देतो, तुझी मुलगी पाठव; लॉकअपमधील महिला आरोपीला मागणी, एएसआय निलंबीत

SCROLL FOR NEXT