MLA Chimanrao Patil while investigating various cases in Tehsildar office. Along with Tehsildar Suchita Chavan esakal
जळगाव

Jalgaon News : एरंडोलला योजनांची 630 प्रकरणे मंजूर! समितीच्या बैठकीत निर्णय

Jalgaon News : एरंडोल येथील तहसीलदार कार्यालयात संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक समितीचे अध्यक्ष आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : एरंडोल येथील तहसीलदार कार्यालयात संजय गांधी निराधार योजना समितीची बैठक समितीचे अध्यक्ष आमदार चिमणराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत विविध योजनांच्या ८३८ प्रकरणांपैकी ६३० प्रकरणे मंजूर करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी दिली. (630 cases of Erandol schemes approved Decision in committee meeting)

तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या संजय गांधी निराधार योजना समितीच्या बैठकीत ८३८ प्रकरणे तपासणीसह मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती. यामध्ये श्रावण बाळ योजनेच्या ४५६, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेच्या २७१, इंदिरा गांधी विधवा योजनेच्या ४४ तर संजय गांधी निराधार योजनेच्या ४४ प्रकरणांचा समावेश होता.

बैठकीत ८३८ पैकी ६३० प्रकरणे मंजूर करण्यात आली तर चार प्रकरणे नामंजूर करण्यात आली. तसेच २०४ प्रकरणांमध्ये त्रुटी असल्यामुळे ते प्रलंबित ठेवण्यात आले. त्रुटी असलेल्या प्रकरणांमध्ये अपूर्ण असलेल्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे. शासनाच्या गरीब. (latest marathi news)

निराधार नागरिकांसाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळण्यासाठी सर्व सदस्यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना समितीचे अध्यक्ष आमदार चिमणराव पाटील यांनी सदस्यांना दिल्या. योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांवर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे सांगितले. बैठकीस तहसीलदार सुचिता चव्हाण.

नायब तहसीलदार देवेंद्र भालेराव, अव्वल कारकून विनायक मानकुंबरे, प्राजक्ता पाठक, समितीचे सदस्य तथा बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, शिवसेनेचे शहरप्रमुख आनंदा चौधरी (भगत), शरद ठाकूर, सुरेखा चौधरी, भानुदास आरखे, महेश पांडे यांच्यासह सदस्य व महसूल कर्मचारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT