Fupanagari to Vadnagari road washed away by rain water. Woman wading through standing water on the road. esakal
जळगाव

Jalgaon Heavy Rain Damage : सर आली धावून... फुपनगरी-वडनगरी रस्ता गेला वाहून! जिल्ह्यात 7 मंडलांमध्ये अतिवृष्टी

जळगाव शहरासह जिल्ह्यात रविवारी (ता. १४) पहाटेपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Heavy Rain Damage : जळगाव शहरासह जिल्ह्यात रविवारी (ता. १४) पहाटेपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. जळगाव तालुक्यात पाच महसूल मंडलांत, तर चोपडा तालुक्यातील दोन महसूल मंडलात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. सततच्या पावसाने जळगाव तालुक्यातील ‘फुपनगरी ते वडनगरी रस्ता’ रविवारी पहाटे झालेल्या पावसात वाहून गेला. यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. शहरासह जिल्ह्यात रात्रीपासून पावसाने जोर धरला आहे. (7 revenue mandals in Chopda taluka have recorded heavy rainfall )

यात सर्वाधिक पाऊस जळगाव व चोपडा तालुक्यांत झाला आहे. जळगाव तालुक्यातील जळगाव, असोदा, पिंप्राळा, नशिराबाद, भोकर या मंडलांत, तर चोपडा तालुक्यातील चोपडा व अडावद या महसूल मंडलांत ६० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. यामुळे येथे अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. शहरातील राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहनधारकांना कसरत करीत वाहने काढावी लागली आहेत.

शहरातील नवीपेठ, जुने जळगाव, पिंप्राळा परिसर शहरातील विविध कॉलन्यांतील खोलगट भागात पाणी साचले आहे. अनेक शेतातही पाणी साचून नुकसान झाले आहे. शहरातील भिकमचंद जैननगर परिसरातील मोतीमहल चौकासमोरील गल्लीत पाणी साचले आहे. रविवारचा दिवस असल्याने शहरात वर्दळ कमी असली, तरी अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते.

स्टेट बँक रोडवर पाणीच पाणी

स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसमोरील रोडवरील सिमेंटचा रोड नुकताच तयार झाला आहे. रोड उंच आणि गटारी खाली झाल्याने पाणी वाहून जाण्यास जागा नाही. यामुळे रोडवर पाणी साचले आहे. स्टेडियम कॉम्प्लेक्समधील दुकानांसमोर प्रचंड पाणी साचल्याने दुकानात जाण्यसाठी वाटच शिल्लक राहिली नव्हती. (latest marathi news)

बजरंग बोगदाही पाण्याखाली

रविवारच्या पावसाने नेहमीप्रमाणे बजरंग बोगदा पाण्याखाली गेला. या बोगद्यातील पाण्याचा निचरा ही मोठी समस्या आहे. अद्यापही त्यावर तोडगा निघू शकलेला नाही. थोडाही पाऊस झाला, तरी बोगदा पाण्याखाली जातो. रविवारी सकाळी जोरदार पाऊस झाल्याने बोगद्यात चार फुटापर्यंत पाणी साचले होते. त्यामुळे दोन्हीकडील वाहतूक ठप्प झाली.

महामार्गालगत पाणी

शहरातून जाणाऱ्या महामार्गालगतही बऱ्याच ठिकाणी पाण्याचे डबके साचले होते. अग्रवाल हॉस्पिटल चौकातील दुतर्फा सेवा रस्त्यांवर पाणीच पाणी होते. भुयारी मार्गातही पाणी साचले होते. तीच स्थिती प्रभात चौकात, दादावाडी- गुजराल पेट्रोलपंपासमोरील भुयारी मार्गाचीही होती. त्यामुळे वाहनधारकांना वाट काढणे कठीण झाले होते.

फुपनगरी ते वडनगरी रस्ता नुकताच बांधला होता. सततच्या पावसाने तो वाहून गेल्यामुळे कामाच्या गुणवत्ता किती खराब आहे, याची प्रचिती नागरिकांना आली. सार्वजनिक बांधकाम विभाग कामाचा दर्जा तपासताना कशाप्रकारे हितपूर्ण काळजी घेतो, याचा हा दाखला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

बांधकाम विभागाला कळविले

खचलेल्या रस्त्यावर भराव टाकण्यास सांगितले आहे. त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला कळविले आहे, अशी माहिती तहसीलदार शितल राजपूत यांनी दिली. दुपारपर्यंत रोड खचलेल्या स्थितीतच होता. खचलेला रोड पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती.

अतिवृष्टी झालेली मंडले अशी

मंडल--पाऊस मिलिमीटर

जळगाव--७८.५

असोदा--९९

पिंप्राळा--८२

नशिराबाद--११७.८

भोकर--८२

चोपडा--११८.३

अडावद--१५३.३

गेल्या २४ तासांतील पाऊस

तालुका--मिलिमीटर

जळगाव--८१.३

भुसावळ--१०.५

यावल--२०.६

रावेर--०.८

मुक्ताईनगर--०.५

अमळनेर--६.३

चोपडा--५१.९

एरंडोल--१४.३

पारोळा--४.६

चाळीसगाव--८.८

जामनेर--२४.१

पाचोरा--११.९

भडगाव--५.३

धरणगाव--२९.६

बोदवड--६.०

एकूण-- १९.९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arijit Singh Retirement : अरिजीत सिंहचा मोठा निर्णय! ‘Playback Singing’ मधून अचानक ‘रिटायरमेंट’ ; लाखो चाहत्यांना धक्का

Pune Tax Hike: निवडणूक झाली, आता पुणेकरांचा प्रॉपर्टी टॅक्स वाढणार! 'एवढ्या' करवाढीचा प्रस्ताव; 10 वर्षांपासून झाली नाही वाढ

Pune Water Supply: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! दुरुस्तीच्या कामामुळे 'या' दिवशी शहराचा पाणीपुरवठा बंद

CM Yogi Adityanath : उत्तर प्रदेशातील शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतलेल्या विद्यार्थ्यांचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून गौरव

Himachal Pradesh Loyal Dog Video : ...अन् ‘हे’ मन हेलावणारं भावनिक दृश्य पाहून, बचाव पथकाच्या डोळ्यातही आलं पाणी!

SCROLL FOR NEXT