Jalgaon News : जळगाव शहराची वाहतुकीच्या प्रचंड कोंडीतून सुटका करण्यासाठी जळगाव बायपास (तरसोद ते पाळधी) चे काम मार्च २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्याचा असा अल्टिमेटम ३० डिसेंबरला झालेल्या महामार्ग प्राधिकरण अधिकारी, कंत्राटदारांच्या बैठकीत देण्यात आला. तीस मार्चला अवघे सहा दिवस शिल्लक असले तरी महामार्गाचे ७० टक्के काम अजूनही अपूर्ण आहे. (Jalgaon 70 percent of Tarsod to Paldhi bypass is still incomplete)
जळगाव शहरातून भुसावळकडे जाताना प्रचंड वाहतुकीचा ताण सहन करीत नागरिकांना जावे लागते. यामुळे महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम कोरोना अगोदरपासून सूरू आहे. तरसोद ते पाळधी बायपासच्या १८ किलोमीटर कामांची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पाहणी करीत अडचणी समजून घेत त्यावर उपायही सुचविले होते.
तीस डिसेंबरला महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी संबंधित कंत्राटदारास पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी प्रसाद यांनी तब्बल तीन महिन्यांचा अवधी देत मार्च अखेर पर्यंत जळगाव बासपास मार्गाचे काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. असे असताना सध्या हा अल्टिमेटम संबधित ठेकेदारांनी धाब्यावर बसविल्याचे चित्र आहे.
राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व ठेकेदारांनी बायपासच्या भराव कामासाठी दीड लाख टन माती, मुरूमाची मागणी केली होती. ती मागणीही शेळगाव बॅरेजमधून नियमानुसार रायल्टी भरून मुरूम, माती उपलब्ध देण्यात आली होती. (latest marathi news)
तरीही काम पूर्ण झाले नाही. उलट तरसोद गावाच्या बोगद्याजवळ वाहतुकीची प्रचंड कोंडी होती. रात्रीच्या वेळी याठिकाणी पथदिवे नाहीत. रात्री अपघात झाला तर लवकर दिसणार नाही अशी स्थिती आहे. मात्र महामार्गाचे अधिकाऱ्यांच्या मुजोरीच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
तरसोद ते पाळधी या १८ किलोमीटरचा बायपास मार्गावर अनेक लहान मोठे गावे येतात. त्यात तरसोद, असोदा, भोकणी, आव्हाणे, मुमुराबाद, जळगाव शिवार, पाळधी आदी गावांचा समावेश आहे. बायपास अंतर्गत तीन ठिकाणी उड्डाणपूल तयार करण्यात येत आहेत. गिरणा नदीवरील तीनशे मीटरच्या पुलाचे काम संथ गतीने सुरू आहे.
जिल्हाधिकारी लक्ष देतील ?
आचारसंहिता सुरु असल्याने जिल्हाधिकारी प्रसाद निवडणूक कामात व्यस्त आहेत. त्यामुळे महामार्गाच्या कामाबाबत लक्ष देण्याकडे वेळ त्यांना नसेल. मात्र मागील तीन महिन्यापूर्वी महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिलेला आदेश पूर्ण होत आहे किंवा नाही, हेही पाहण्यास त्यांना वेळ नसेल तर...सर्वच अलबेल समजावे लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.