jalgaon sakal
जळगाव

Jalgaon : दारूच्या नशेत चिरला तरुणाचा गळा

आपसांतील वाद : संशयिताकडून गुन्ह्याची कबुली

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील कानळदा रोड परिसरात एस. के. ऑइल मिलजवळ पुरुषोत्तम धाईतडक (वय २५) याच्या गळ्यावर शेख अक्रम कय्यूम (रा. भारतनगर) याने धारदार शस्त्राने हल्ला करून गळा चिरल्याची घटना शनिवारी (ता. २५) रात्री घडली. याप्रकरणी रात्री बारानंतर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन पालिसांनी संशयिताला अटक केली. त्यास रविवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

कानळदा रोड परिसरात एस. के. ऑइल मीलजवळ पुरुषोत्तम धाईतडक आई-वडील व भावासह राहतो. तो रेल्वेत काकडी विकून कुटुंबाला मदत करतो. शनिवारी रात्री पुरुषोत्तम घराजवळील बौद्धविहाराजवळ रेल्वेत काम करणाऱ्या त्याच्या मित्रांसह दारू पित असताना तिघांमध्ये वाद झाला. दारूच्या नशेत तर्रर्र अक्रम शेख याने पुरुषोत्तमवर चॉपरने वार करून त्याची मान चिरली. वेळीच तो सावरल्याने वार कानाच्या बाजूने होऊन अनर्थ टळला. हल्ला होताच रक्ताची धार लागल्याने त्याने घराच्या दिशेने धाव घेतली. हा प्रकार त्याच्या कुटुंबीयांच्या लक्षात आल्यावर त्यांनी रिक्षाने जखमी पुरुषोत्तमला जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

पोलिसांची धावपळ

घटनेची माहिती कळताच सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. उपनिरीक्षक जगदीश मोरे, किरण पाटिल, तेजस मराठे, विजय निकुंभ, गजानन बडगुजर, उमेश भांडारकर यांच्या पथकाने तपासचक्रे फिरवत तातडीने अक्रम शेख कय्यूम (वय २८) यास ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच अक्रम याने गुन्ह्याची कबुली दिली.

संशयिताला कोठडी

याप्रकरणी रात्री बाराच्या सुमारास पुरुषोत्तमची आई रेखा धाईतडक यांच्या फिर्यादीवरुन शेख अक्रम कय्यूम (रा. भारतनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. अटकेतील संशयित शेख अक्रम यास रविवारी (ता. २६) जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Update: MPSC चा मोठा निर्णय! 11 हजार जागांची वाढ; तलाठ्यांच्या किती जागा? परीक्षा कधी? नव्याने अर्ज कधी करता येणार?

Solapur Accident: सोलापूर-पुणे महामार्गावर काळाचा घाला! कंटेनरला कारची धडक; आजी-आजोबा, सून अन् नातवाचा मृत्यू

Nashik Road Accident: रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षेकडे दुर्लक्ष; खोल खड्ड्यात ट्रॅक्टर पलटी, १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू

Pune Crime: ओतूर पोलिसांचा दुचाकी चोरट्यांना दणका! तीन आरोपी अटकेत; पाच लाखांच्या नऊ मोटारसायकली जप्त

Beed Crime: फेसबुकवरील साड्यांच्या जाहिरातीचा सायबर सापळा; ८.६४ लाखांची फसवणूक, दोन लाख रुपये होल्ड

SCROLL FOR NEXT