Amalner traffic police while taking action on unruly parked vehicles esakal
जळगाव

Jalgaon News : अमळनेर शहरात बेशिस्त पार्किंग करणाऱ्या 54 वाहनांवर कारवाई!

Jalgaon News : शहरातील मुख्य रस्ते व बाजारपेठेत बेशिस्त पार्किंग करणाऱ्या ३९ वाहनांवर अमळनेर पोलिसांनी दंडात्मक कारवाई, तर १५ वाहनधारकांवर न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शहरातील मुख्य रस्ते व बाजारपेठेत बेशिस्त पार्किंग करणाऱ्या ३९ वाहनांवर अमळनेर पोलिसांनी दंडात्मक कारवाई, तर १५ वाहनधारकांवर न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे. शहरातील मुख्य रस्ते, विविध बँका, कार्यालये व वर्दळीच्या ठिकाणी वाहनचालक बेशिस्तपणे वाहन लावतात. त्याचा त्रास सामान्य नागरिकांना सहन करावा लागतो. (Action taken against 54 vehicle parking illegally in Amalner)

त्यानुसार उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर यांच्या आदेशाने पोलिस निरीक्षक विकास देवरे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांची तीन पथके तयार करून शहरातील विविध भागांत त्यांची नेमणूक केली होती. त्यानुसार बेशिस्त पार्किंग करणाऱ्या ३९ वाहनांवर २४ हजार ४०० रुपयांची दंडात्मक कारवाई.

तर १२ वाहनांवर भादंवि कलम २८५ व ३ वाहनांवर भादंवि कलम २८१प्रमाणे न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पथकात पोलिस उपनिरीक्षक अक्षदा इंगळे, भगवान शिरसाट, भय्यासाहेब देशमुख. (latest marathi news)

सहायक फौजदार राजेंद्र कोठावदे, पोलिस कॉन्स्टेबल सचिन पाटील, संदेश पाटील, विजय भोई, लक्ष्मीकांत शिंपी, भूषण परदेशी, मयूर पाटील आदींचा समावेश होता.

दरम्यान, पोलिसांकडून झालेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांनी मुख्य रस्ते व चौकात वाहतुकीला अडथडा निर्माण करणाऱ्या वाहनांवर नियमित कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT