Farmers while cultivating agriculture. esakal
जळगाव

Jalgaon Agriculture News : भुसावळला 27 हजार हेक्टरवर पेरण्यांचे उद्दिष्ट; तालुक्याचे खरिपासाठी कृषी विभागाकडून आढावा

Jalgaon Agriculture : हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाला आहे.

विनोद सुरवाडे

Jalgaon Agriculture News : हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार मॉन्सून संपूर्ण महाराष्ट्रात दाखल झाला आहे. त्यामुळे राज्यात बहुतेक ठिकाणी मुसळधार ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. परंतु भुसावळ तालुक्यातील शेतकरी अजूनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्यात यंदा २७ हजार ९३३ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट आहे. पेरणीसाठी शेती मशागतीची कामे पूर्ण करून वरुणराजाची प्रतीक्षा करीत आहे. (Aim to sow Bhusawal on 27 thousand hectares )

बळीराजा परिस्थिती नसतानाही खते, बी-बियाणे घेऊन सज्ज झाला आहे. मात्र दमदार पावसाच्या प्रतीक्षा आहे. मागीलवर्षी जून दहापासून पेरण्यांना सुरवात झाली होती. मात्र यंदा जून संपत आला तरी अद्याप दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत असून, मुलांच्या शाळा व पेरणी एकत्र येत असल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या असताना तालुक्यात २७ हजार ९३३ हेक्टर क्षेत्रफळावर खरिपाचे उद्दिष्ट आहे.

शेतकऱ्यांनी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच मशागतीची कामे उरकली आहेत. यंदाच्या उन्हाळ्यात ४३ अंशाच्या वर पारा गेला होता. रखरखत्या उन्हात शेतकऱ्यांनी मशागतीची कामे पूर्ण केली; परंतु, जूनचा पहिला पंधरवाडा संपला तरी मॉन्सूनचे आगमन झाले नाही. हवामान कोरडेठाक असल्याने पेरणीला उशिरा होत आहे. (latest marathi news)

बियाणे घरात येऊन पडलेले असतानाही जमिनीत ओल नसल्यामुळे पेरणी करणार कशी? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. परिणामी, संपूर्ण तालुक्यात पेरण्या रखडल्या आहेत. दुसरीकडे शासनाने रासायनिक खताचे दर जाहीर केले असून, खताच्या किमती मागील वर्षी पेक्षा १० ते २५ टक्यांनी वाढल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतिचे खत घेणे शक्य होणार नाही.

''पावसाला सुरवात झाली असली तरी पुरेसा पाऊस अद्याप झालेला नाही. ओल जमिनीत गेल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरण्या करू नये. हवामान खात्याच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी पुढील आठवड्यात थांबणे गरजेचे आहे; अन्यथा दुबार पेरणी संकट ओढवले जाईल.''- शरद बोरसे, तालुका कृषी अधिकारी, भुसावळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : छत्तीसगडमधील जगदलपूर येथे २१० नक्षलवाद्यांनी पत्करली शरणागती

Nagpur fraud:'नागपुरात सेवानिवृत्त महिलेची १२ लाखांची फसवणूक'; ‘डिजिटल अरेस्ट’मधून घडली घटना, नेमकं काय घडलं?

पाकिस्तानचा अचानक हवाई हल्ला, अफगाणिस्तानच्या ८ क्रिकेटर्ससह ४० जणांचा मृत्यू

Revenue Minister Chandrashekhar Bawankule: शेतकऱ्यांना लवकरच मदत मिळणार : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महसूल यंत्रणा सुट्टीतही कार्यरत

Maharashtra Farmers : अतिवृष्टीची भरपाई आज शक्य, सर्व जिल्ह्यांचे पंचनामे अहवाल सादर; दोन टप्प्यात वितरित

SCROLL FOR NEXT