Farmer Namdev Mali along with officials of Agriculture Office on the occasion of Soybean sowing under BBF method. esakal
जळगाव

Jalgaon Agriculture News : रुंद वरंबा, सरी लागवड तंत्रज्ञानाने बियाणे, खतांमध्ये बचत

Jalgaon Agriculture : ‘रुंद वरंबा व सरी लागवड’ अर्थात बीबीएफ पद्धतीने पेरणी केल्यास बियाणे व खते यात २० ते २५ टक्के बचत होऊन १५ ते २० टक्के उत्पादनात वाढ शक्य होते.

संजय पाटील

Jalgaon Agriculture News : ‘रुंद वरंबा व सरी लागवड’ अर्थात बीबीएफ पद्धतीने पेरणी केल्यास बियाणे व खते यात २० ते २५ टक्के बचत होऊन १५ ते २० टक्के उत्पादनात वाढ शक्य होते. शिवाय वेळेवर खते दिली गेल्याने खते देण्याचा मजुरी खर्च वाचतो. अवर्षणप्रवण, पावसावर आधारित कोरडवाहू शेतीस ही पद्धत वरदान ठरत असून, सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, तूर, भुईमूग, कापूस, मका, हरबरा, गहू आदी १८ प्रकारच्या पिकांसाठी उपयुक्त पद्धत आहे. (Sowing in seeds fertilizers with broad rain planting technology )

कृषी विभागाच्या तालुका बिजगुणन केंद्र येथील प्रक्षेत्रावर बिजोत्पादन कार्यक्रमांतर्गत खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये रुंद वरंबा व सरी लागवड (बीबीएफ) तंत्रज्ञानाने सोयाबीन व खरीप ज्वारी पिकांची पेरणी केली. याप्रसंगी उपस्थित कर्मचारी व शेतकऱ्यांना प्रत्यक्ष बीबीएफ यंत्राने पेरणी प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले. तसेच या पद्धतीने पेरणीचे करण्याचे अनेकविध फायदे, आवश्यकता याबाबत तालुका कृषी अधिकारी डी. पी. डमाळे यांनी मार्गदर्शन केले.

अमळनेर उपविभागीय कृषी अधिकारी सी. डी. साठे यांच्या मार्गदर्शनाखाली पेरणी नियोजन केले. बीबीएफ पद्धतीने किंवा यंत्राने सोयाबीन व खरीप ज्वारी पेरणीबाबत तालुका ‘सीडफार्म’चे कृषी पर्यवेक्षक बी. एम. लांडगे यांनी सविस्तर माहिती दिली. उताराला आडवी पेरणीमुळे मूलस्थानी जलसंधारण शक्य होते. (latest marathi news)

बदलते हवामान व नैसर्गिक आपत्तीमुळे जास्त प्रमाणात पाऊस झाल्यास सरीतून अतिरिक्त पाणी निचरा होतो आणि कमी पाऊस किंवा पावसाचा खंड पडल्यास वाफ्यात ओलावा टिकून असल्याने होणारे नुकसान कमी करता येते किंवा नुकसानीचा धोका टाळता येतो. चार किंवा सहा ओळीनंतर ४५ किंवा ६० सेंटिमीटर रुंदीची सरी यंत्राने होते किंवा कोळपेने करावी.

बीबीएफ यंत्राने पेरणी शक्य न झाल्यास ॲडजेस्टने १५० सेंमीपर्यंत गादीवाफा म्हणजे बेड रुंद वरंबा तयार करून नंतर ४५ किंवा ६० से.मी.रुंदीची सरी कोळपणी (डवरणी) वेळी म्हणजे पेरणीनंतर २१ दिवसांनी सोडलेल्या रिकाम्या ओळीत कोळप्याला दोरी बांधून सरी काढूनही ही पद्धत राबविता येते. म्हणजे अतिरिक्त पाणी निचरा होऊन हवा खेळती राहते. पीक जोमदार वाढते. जमिनीची धूप प्रतिबंध होतो. आंतरमशागत व फवारण्या सोयीस्कर होतात.

सेंद्रिय पदार्थ तयार करणारे जीव जिवाणू वाढ संभवते. पिकांची मुळांची स्थिती चांगली होतात. कार्बनडाय ऑक्सिइड उपयोगिता वाढते. परागीकरणास मदत होते. कीड, रोग प्रादुर्भाव कमी होतो. परिणामी, खर्चात बचत शक्य होते, असे कृषी पर्यवेक्षक लांडगे यांनी सांगितले. याप्रसंगी कृषी पर्यवेक्षक एस. के. राठोड, सुरेश लांडगे, कृषी सहाय्यक ज्ञानेश्वर जाधव, मनोहर पितृभक्त, बी. आर. पाटील, आत्मा योजनाचे श्री. बोरसे व शेतकरी नामदेव माळी आदी शेतकरी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नगराध्यक्षांची निवड जनतेतूनच! दिवाळीतच वाजणार निवडणुकांचा बिगुल; पहिल्या टप्प्यात नगरपालिका किंवा झेडपी, पंचायत समित्यांची निवडणूक

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा हेल्दी एग रोल, पाहा रेसिपीचा Video

आजचे राशिभविष्य - 03 ऑक्टोबर 2025

अग्रलेख : अस्वस्थ स्वातंत्र्ययोद्धा

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 03 ऑक्टोबर 2025

SCROLL FOR NEXT