Natak esakal
जळगाव

Khandesh Natya Mahotsav: खानदेश नाट्य महोत्सवात विनामूल्य दर्जेदार नाटकांची मेजवानी : अनिल कोष्टी

Jalgaon News : भुसावळ येथील उत्कर्ष कलाविष्कार तर्फे येत्या एक मार्च पासून १४ व्या खानदेश नाट्य महोत्सवात सात दर्जेदार नाटकांची रसिकांना विनामूल्य मेजवानी मिळणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : येथील उत्कर्ष कलाविष्कार तर्फे येत्या एक मार्च पासून १४ व्या खानदेश नाट्य महोत्सवात सात दर्जेदार नाटकांची रसिकांना विनामूल्य मेजवानी मिळणार आहे. या महोत्सवात उद्या (ता. २६) खानदेशी दिग्दर्शकांचा 'शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल' होणार आहे. अशी माहिती उत्कर्ष कलाविष्कारचे अध्यक्ष अनिल कोष्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. (jalgaon Khandesh Natya Mahotsav marathi news)

कोष्टी म्हणाले, २०१० पासून होणाऱ्या नानासाहेब देविदास फालक स्मृती खानदेश नाट्य महोत्सवात आता पर्यंत ८० नाटकांचे सादरीकरण झाले. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक व कल्याण येथील कलावंतांनी नाटक सादर केली आहेत. यंदा ओबेनॉल फाऊंडेशन प्रस्तुत हा महोत्सव एक ते तीन मार्च असा तीन दिवस श्री कृष्णचंद्र सभागृहात होणार आहे.

महोत्सव परिसराला नाटककार नाटककार राहुल बनसोडे नाट्यपरिसर नाव देण्यात आले आहे. पहिल्या दिवशी सकाळी साडे दहाला ओबेनॉल केमिकल प्रा. लि. चे संचालक अश्विनीकुमार परदेशी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होईल. पहिल्या सत्रात घाटे स्कूलचे विद्यार्थी 'वारी' हे बालनाट्य, उत्कर्ष कलाविष्कारचे 'सेल नसलेला रेडिओ ' ही एकांकिका सादर होईल.

सायंकाळच्या सत्रात पुणे येथील आजकल या संस्थेचे 'खरा इन्स्पेक्टर मागावर' व नाशिकच्या स पा न या संस्थेचे 'तो राजहंस एक' हे नाटक सादर होईल. दुसऱ्या व तिसऱ्या दिवशी देखील दर्जेदार नाटकांची मेजवानी असून ही नाटके रसिकांना विनामूल्य पाहता येणार आहे. महोत्सवात जिल्ह्यातील दहा नामवंत छायाचित्रकारांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन व नाट्य परिसंवादही होणार आहे. पत्रकार परिषदेला सुशील पाटील, प्रा. विलास सोळुंके, राजपालसिंग राजपूत उपस्थित होते. (Latest Marathi News)

'आजच्या शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल' विषयी....

उद्या सोमवारी (ता. २६) नाहाटा महाविद्यालयात शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल' होईल. खानदेशातील कलावंतांनी तयार केलेल्या पुरस्कार प्राप्त शॉर्ट फिल्म या फेस्टिव्हलमध्ये पाहता येणार आहे. यात स्वप्नील कापुरे (पारोळा) यांनी बनवलेल्या 'भर दुपारी'या शॉर्ट फिल्मला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे.

सोबतच त्यांनी दिग्दर्शित केलेली 'सत्यवान' ही एक शॉर्ट फिल्म दाखवली जाणार आहे. दिग्दर्शक लक्ष्मीकांत सुतार पाडळसे (ता. यावल) या गावचे ते रहिवासी असून हल्ली पुणे व जर्मनी अशा दोन ठिकाणी त्यांचं वास्तव्यास असतात त्यांची 'अलर्ट बा' व 'नवाज' या दोन शॉर्ट फिल्म व मिलिंद विसपुते यांनी बनवलेल्या 'सिलवट', 'विभक्ती' या शॉर्ट फिल्म व नवीन येणाऱ्या 'पैलवान धाबा' सिरीयलचा प्रोमो दाखवला जाणार आहे.

दिग्दर्शक राजू शेख हे भुसावळ येथील रहिवासी असून यांनी तीन शॉर्ट फिल्म आणि जवळपास पाच ते सहा रॅप सॉंग दिग्दर्शित केले आहे. सर्व दिग्दर्शकांचा शॉर्ट फिल्म फेस्टिवल मध्ये सत्कार करण्यात येणार आहे अशी माहिती कोष्टी यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fishing Ban: महाराष्ट्रात मासेमारी बंदीचा कालावधी वाढला! सरकारचा मोठा निर्णय; आता किती दिवस बंदी राहणार? जाणून घ्या...

Solapur Crime: सोलापुरात धक्कादायक प्रकार! डॉ. वळसंगकरांचे जावई सुजय फडकेविरुद्ध ‘पोक्सो’, पोलिसांत गुन्हा; अल्पवयीन मुलीचा विनयभंग अन्‌ छळाचा आरोप

PMOS वर घरगुती उपाय शोधताय? अभिनेत्री भाग्यश्रीने शेअर केली 'या' पाण्याची हेल्थ टिप, नक्की ट्राय करा

Gadhphara Treasure: या किल्ल्यात रात्री खजिना शोधायला येतात पर्यटक! JCB चालकाला सापडलेल्या सोन्याच्या ४ घागरी, काय आहे रहस्य?

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT