Home Guard Recruitment  esakal
जळगाव

Jalgaon Home Guard Recruitment : होमगार्ड भरतीसाठी अर्ज भरण्यास सुरवात

Home Guard Recruitment : जिल्‍ह्यातील ३३ पोलिस ठाण्यांतर्गत तब्बल ३२५ होमगार्डच्या रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Home Guard Recruitment : जिल्‍ह्यातील ३३ पोलिस ठाण्यांतर्गत तब्बल ३२५ होमगार्डच्या रिक्त जागांवर भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र उमेदवारांनी २५ जुलै ते १४ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. साधारण तीन वर्षे सलग काम केल्यास पोलिस भरतीत या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. पोलिस, अग्निशमन आणि वन विभागाच्या भरतीत होमगार्डंना ५ टक्के आरक्षण दिले जाते. होमगार्डपदासाठी किमान दहावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतो. (Application for Home Guard Recruitment is started from today)

उमेदवाराचे वय २० ते ५० वर्षे असावे. रुष उमेदवारासाठी उंची १६२ सेंटिमीटर व महिलासाठी १५० सेंटिमीटर फक्त पुरुष उमेदवारांसाठी न फुगविता छाती ७६ सेंटिमीटर, कमीत कमी ५ सेंटिमीटर फुगविणे आवश्यक आहे. मतदान ओळखपत्र, आधारकार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, खासगी नोकरी करीत असल्यास मालकाचे ना-हरकत प्रमाणपत्र, ३ महिन्यांतील पोलिस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक आहेत

होमगार्डंना बंदोबस्त काळात प्रतिदिन ५७० रुपये, कर्तव्य भत्ता व १०० रुपये उपहारभत्ता दिला जातो. प्रशिक्षण काळात ३५ रुपये खिसाभत्ता, १०० रुपये भोजनभत्ता व ९० रुपये कवायत भत्ता दिला जातो. https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentform.php या संकेतस्थळावर फक्त इंग्रजी भाषेत अर्ज भरावा. एका उमेदवाराला आधारकार्ड क्रमांकाच्या सहाय्याने एकदाच अर्ज दाखल करता येईल.

रहिवास असलेले पोलिस ठाणे आणि पथकात अर्ज करता येईल. इतर जिल्ह्यातील अर्ज बाद ठरतील. अर्ज SUBMIT केल्यावर Print Registration Form या मेनूमध्ये जाऊन त्याची छायांकीत प्रत काढावी. त्यावर फोटो चिटकवावा. मराठीमधील नाव उमदवारांनी स्वतः पेनाने लिहावयाचे अहे. इतर कोणतीही माहिती उमेदवारांनी भरू नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT