Principal Tushar Nerkar giving the appointment letter to the heirs of the scavengers. Officials of Neighborhood Associations. esakal
जळगाव

Jalgaon News : सफाई कामगारांच्या 8 वारसांना अमळनेर पालिकेत नेमणुका

Jalgaon : सामाजिक न्याय व कल्याण विभागाच्या शासन निर्णयानंतर लाड व पागे समितीच्या वसुली वारसा पद्धतीनुसार प्रथमच आठ वारसांना येथील पालिकेत नेमणुका देण्यात आल्या.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठाच्या निर्णयानंतर तथा सामाजिक न्याय व कल्याण विभागाच्या शासन निर्णयानंतर लाड व पागे समितीच्या वसुली वारसा पद्धतीनुसार प्रथमच आठ वारसांना येथील पालिकेत नेमणुका देण्यात आल्या. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्या हस्ते सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्तिपत्रे देण्यात आली. (Appointment of after 8 years of sweepers in Municipal )

खंडपीठातील दिवाणी रिट याचिकेत गोपाल मकूलाल बिऱ्हाडे व इतर विरुद्ध कैलास मारोती राजकोर या प्रकरणात न्या. घुगे व न्या. खोब्रागडे यांच्या खंडपीठाने प्रदीर्घ अभ्यास करून १९७५ पासून सुरू असलेला शासन स्वीकृत लाड व पागे समितीच्या निर्णयानुसार अनुसूचित जातीच्या सफाई कामगारांना त्यांच्या निवृत्तीनंतर मिळणाऱ्या वारसा पद्धतीने नेमणुकांबाबत स्थगिती आदेश उठवून मागासवर्गीय ५९ जातींपैकी ५६ जातींना न्याय देत त्यांचा लाड व पागे समितीच्या शिफारशीनुसार नेमणूक देण्याचा मार्ग मोकळा केला होता. (latest marathi news)

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्याकडील १२ जुलै २०२४ च्या राज्यातील अनुसूचित व जाती नवबौद्धांसह सफाई कामगारांच्या वारसांना नेमणुका देण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार अमळनेर पालिकेतही गुरुवारी (ता. २५) मुख्याधिकारी नेरकर यांनी आठ सफाई कामगारांच्या रिक्त पदांवर सफाई कामगारांच्या वारसास नेमणुका दिल्या.

यानिमित्त श्री. नेरकर यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे, माजी नगरसेवक नरेंद्र संदानशिव, कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस सोमचंद संदानशिव, ज्ञानेश्वर संदानशिव, गोपाल बिऱ्हाडे, गोल्डी बिऱ्हाडे, गोपाल गजरे, मेजर विनोद बिऱ्हाडे, राजेंद्र संदानशिव, अविनाश संदानशिव, भरत सोनवणे यांच्यासह सफाई कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लवकर सुधारणा करा! मुख्यमंत्र्यांची नगर विकास खात्याच्या कामावर नाराजी, फडणवीस अन् शिंदे यांच्यात ऑल इज नॉट वेल?

Mumbai Metro: बेस्टनंतर मेट्रोचा पुढाकार! गणेशोत्‍सवात रेल्‍वे मध्यरात्रीपर्यंत धावणार; पहा वेळापत्रक

Ganesh Festival 2025 : धूप-अत्तराचा गंध, सोबतीला भक्तिभावाचा आनंद; गणेशोत्सवानिमित्त भाविकांकडून पूजा साहित्य संचाला विशेष मागणी

Crime News : नाशिकमध्ये गटबाजीचा राडा; माजी नगरसेवक उद्धव निमसेंसह 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Jalna Water Supply: लघुपाटबंधारे विभाग, मनपाच्या गोंधळाने दुरुस्तीकडे दुर्लक्ष; ‘घाणेवाडी’च्या सुरक्षा भिंतीचे निखळले पिचिंग

SCROLL FOR NEXT