Gadipati Prasad Maharaj of Sant Sakharam Maharaj Sansthan while leaving for Pandharpur on foot. Warkari participating in the second photo. esakal
जळगाव

Jalgaon Ashadhi Wari: संत सखाराम महाराज पायीवारीचे पंढरपूरकडे प्रस्थान! 575 किलोमीटर पायी वारीचे 24 दिवसाचे नियोजन

Jalgaon News : महाराजांच्या उपस्थितीत, शेकडो भाविकांबरोबर ‘राम कृष्ण हरी’च्या गजरात अमळनेरवरून पंढरपूरकडे प्रस्थान झाले.

सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : संत सखाराम महाराजांची पायी वारीचे रविवारी (ता. २३) गादीपती प्रसाद महाराजांच्या उपस्थितीत, शेकडो भाविकांबरोबर ‘राम कृष्ण हरी’च्या गजरात अमळनेरवरून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. (Jalgaon Ashadhi Wari Departure of Saint Sakharam Maharaj to Pandharpur)

१७८५ पासून ही वारी सुरू आहे. सुमारे २३९ वर्षांची परंपरा वारीला असून, अमळनेर ते पंढरपूर वारी या वर्षीही संतश्री प्रसाद महाराजांच्या नेतृत्वात २३ जून ते १५ जुलैदरम्यान चालणार आहे. अमळनेर ते पंढरपूर सुमारे ५७५ किलोमीटर पायी वारीचे २४ दिवसांचे नियोजन संस्थानने केले आहे.

वारीला जाणाऱ्या भाविकांची दोन दिवसांपूर्वी वाडी संस्थांतर्फे नोंदणी झाली. अमळनेरहून दोनशेपेक्षाही अधिक वारकरी वारीत सहभागी झाले आहेत. पुढे वारकऱ्यांची संख्या वाढत वाढत जाऊन करमाळापर्यंत ७०० ते ८०० पर्यंत होते. वारीत साधारणतः रोज २५ ते ३० किलोमीटर चालणे असते.

रविवारी पहाटे पाचला प्रसाद महाराजांचे प्रस्थानाचे भजनानंतर, पांडुरंगाचा निरोप घेऊन साडेसहाला वाडी सोडून पैलाड भागातील तुळशीबागेत महाराज पोचले. तेथे महाराजांची पूजापाठ आणि तुळशीपत्र तुळशीबागेत झाले. त्यानंतर ते भाविकांना दर्शनासाठी तुळशीबागेत उपस्थित होते. दुपारी बाराला वाडी संस्थांनाचे मानाचे विश्वस्तांनी महाराजांचा सत्कार केला.

नंतर पुजाऱ्यांनी महाराजांच्या डोक्यावर घोंगडी टाकून व गळ्यात विना आणि हातात चिपळ्या देऊन पांडुरंगाच्या नामस्मरणाने दिंडीने पंढरपूरकडे प्रस्थान केले. वारीत महाराजांसोबत पांडुरंगाची मूर्ती, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा आणि नाथ भागवत, असे तीन ग्रंथ महाराजांसोबत असतात. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत वारी पारोळ्याकडे रवाना झाली. राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (latest marathi news)

दिंडीचा मार्ग

दिंडी रविवारी सडावणमार्गे सायंकाळी पारोळ्यात मुक्कामाला पोचली. सोमवारी (ता. २४) सकाळी पारोळ्याहून सायंयाकाळी आडगावला पोचेल. मंगळवारी (ता. २५) भडगावला संपूर्ण दिवस वारी थांबेल. बुधवारी (ता. २६) भडगावहून सायंकाळी नगरदेवळ्यात पोचेल. गुरुवारी (ता. २७) नेरीला संपूर्ण दिवस थांबणार आहे.

शुक्रवारी (ता. २८) सकाळी नागदहून निघून सायंकाळी बिलखेडा येथे पोचेल. शनिवारी (ता. २९) नागापूरला संपूर्ण दिवस थांबेल. रविवारी (ता. ३०) सकाळी नागापूरहून सायंकाळी पिशोर येथे पोचेल. १ जुलैला सकाळी पिशोरहून सायंकाळी चिकालठाणा येथे पोहोचेल. २ ला सकाळी चिकालठाणाहून निघून सध्याकाळी टाकळी येथे पोहोचेल. ३ ला सकाळी टाकळीहून सायंकाळी दौलताबादला पोचेल.

४ ला सकाळी (रांजणगाव शे.पु.) वाळुजहून सायंकाळी म्हारोळा येथे पोचेल. ५ ला सकाळी बिडकिन/ ढोरकिनहून पैठण येथे पोहोचेल. ६ ला सकाळी पैठणहून सायंकाळी शेवगावला पोचेल. ७ ला सकाळी चितळीहून सायंकाळी पाथर्डी येथे पोचेल. ८ ला सकाळी माणिकदवंडीहून सायंकाळी धामणगाव येथे पोचेल.

९ ला सायंकाळी आष्टी येथे पोहोचेल. १० ला आष्टी/डोणगावहून सायंकाळी अरणगावला पोचेल. ११ ला सकाळी फक्राबादहून सायंकाळी नानज येथे पोहोचेल. १२ ला सकाळी जवळाहून सायंकाळी करमाळा येथे पोहोचेल. १३ ला सकाळी निंभोऱ्याहून सायंकाळी वडशिवणे येथे पोहोचेल. १४ ला सकाळी दहिवली/सापटणे येथून सायंकाळी करकंब येथे पोहोचेल. १५ ला करकंब/गुरसाळा येथे महाराजांचे भजन होऊन रात्री उशिरा पंढरपुरात वारी पोहोचेल.

१६ ला सायंकाळी साडेपाचनंतर महाराष्ट्रातून येणाऱ्या मानाच्या दिंड्या यात प्रामुख्याने संतश्री निवृत्तीनाथ, संतश्री ज्ञानेश्वर माऊली, संतश्री सोपान काका, संत मुक्ताबाई, संतश्री एकनाथ महाराज, संतश्री नामदेव महाराज व संतश्री तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांचे स्वागत व मानाचे निमंत्रण देण्याचा मान हा अमळनेरच्या वाडी संस्थांनाच्या गादी पुरुषांना आहे. त्यामुळे महाराज पंढरपूरच्या गाववेशीवर जाऊन या सर्व दिंडीचे मानाचे नारळ देऊन स्वागत करतात व मानाचे निमंत्रण दिल्यानंतर मग सर्व मानाच्या दिंड्या पंढरपुरात दाखल होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagan Mohan Reddy: मोठी बातमी! जगनमोहन रेड्डींच्या पक्षाने 'NDA'च्या सीपी राधाकृष्णन यांना जाहीर केला पाठिंबा

Uttar Pradesh : योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये केले देशातील दुसऱ्या हरित हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन

ब्रेकिंग! 18 दिवसांत अतिवृष्टीने राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील 3.73 लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट; कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल; पंचनामे करण्यास ई-पीक पाहणीची अडचण

MP Nilesh Lanke : श्रीरामपूर-परळी ब्रॉडगेज प्रकल्प पुन्हा सुरू करा; नीलेश लंके यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

6,6,6,6,6,6! भारतीय गोलंदाजाची T20 मध्ये १९ चेंडूंत फिफ्टी, आठव्या क्रमांकावर आला धुमाकूळ घातला, नंतर ३ विकेट्सही टिपल्या

SCROLL FOR NEXT