NCP esakal
जळगाव

Assembly Election : जिल्ह्यात NCP लढविणार 3 जागा; अमळनेर, रावेर-यावल अन मुक्ताईनगर मतदारसंघाची मागणी

Assembly Election : राज्यात महायुतीचे शासन आहे. त्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सामावेश आहे.

सकाळ वृत्तसेवा

Assembly Election : राज्यात महायुतीचे शासन आहे. त्यात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सामावेश आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या स्थितीत ११ पैकी दहा जागांवर महायुतीचे आमदार आहेत. त्यात तीन मंत्री आहेत. एक काँग्रेसचे आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे सध्या अमळनेर मतदारसंघाची जागा आहे. त्या जागासोबतच रावेर-यावल व मुक्ताईनगर मतदारसंघांची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. (NCP will contest 3 seats in district Amalner Raver Yawal and Muktainagar constituency )

जिल्ह्यात सर्वच पक्षांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. इच्छुकांनी फिल्डींग लावून आपल्यालाच तिकीट मिळेल, या आशेवर मतदारांशी संपर्क अभियान सुरू केले आहे. महाविकास आघाडीतही तीन पक्ष आहेत. काँग्रेसचे जिल्ह्यात एकच आमदार असले, तरी ते ११ जागांवर दावा करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष सात जागांवर दावा करीत आहे, तर शिवसेना (उबाठा) पक्षाचे अजून काहीच ठरलेले नाही. शिवसेना (उबाठा) पक्षात अनेक इच्छुक आहेत.

मात्र, जिल्ह्यातील ११ मतदारसंघात किती जागा त्यांना मिळतील, याची खात्री अजून देता येत नाही. महाविकास आघाडीत राज्य स्तरावर जो निर्णय होईल, तो मान्य असेल, असे शिवसेना (उबाठा) पक्षाचे पदाधिकारी सांगतात. सत्ताधारी महायुतीत भाजपकडे सध्या जळगाव शहर, जामनेर, भुसावळ, चाळीसगाव हे मतदारसंघ आहेत. शिवसेनेकडे जळगाव ग्रामीण, चोपडा, एरंडोल-पारोळा, पाचोरा हे मतदारसंघ आहेत. (latest marathi news)

मुक्ताईनगरला अपक्ष आमदार असले, तरी ते मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अमळनेरचा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्ह्यात ताकद वाढवायची असेल, तर अधिकाधिक विधानसभेच्या जागा लढवायला हव्यात, असे पदाधिकाऱ्यांना वाटते. मात्र, महायुतीत आपल्या वाट्याला किती जागा येतात, हे जागा वाटपावेळी ठरेल.

रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांना चांगला लीड मिळवून दिल्याने रावेर-यावल व मुक्ताईनगर मतदारसंघाची मागणी मी पक्षाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे रावेर लोकसभा जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी दिली. रावेरच्या जागेची आम्ही मागणी करू. महायुतीत जळगाव जिल्ह्यात जागावाटपाचे सूत्र अजून ठरले नाही, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FlyDubai Co-Pilot Case : इस्रायलमध्ये विमान क्रॅश करण्याचा कट; फ्लाईदुबईच्या को-पायलटला होणार 'फायरिंग स्क्वॉड'द्वारे मृत्युदंड?

Darvha News : नितेश राणेंच्या ताफ्यावर फेकल्या कोंबड्या; दारव्हा तालुक्यात ठाकरेसेनेची घोषणाबाजी; मच्छीमारांना मदत जाहीर करण्याची मागणी

Latest Marathi News Live Update : राज ठाकरे MPSC आंदोलकांच्या भेटीसाठी पुण्यात दाखल

LPG Rule: उत्तर प्रदेशमध्ये 1200 कुटुंबांचा गॅस पुरवठा रोखला; 413 कुटुंबांचे कनेक्शन तोडले, नेमकं कारण काय?

'दृश्यम ३' थिएटर गाजवतोय पण ओटीटीवर अचानक ट्रेंड होतोय अजय देवगनचा ११ वर्ष जुना चित्रपट; तुम्ही पाहिलाय का?

SCROLL FOR NEXT