Prahlad Bansode esakal
जळगाव

Jalgaon News : जळगाव बदलीसाठी सहाय्यक निरीक्षकाने उचलले टोकाचे पाऊल

Jalgaon News : सहाय्यक पोलिस निरीक्षकाने मुंबईत वाकोला शासकीय पोलिस वसाहती छतावर जाऊन गळफास घेतल्याची घटना मंगळवार (ता.२८) सायंकाळी घडली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील मूळ रहिवासी सहाय्यक पोलिस निरीक्षकाने मुंबईत वाकोला शासकीय पोलिस वसाहती छतावर जाऊन गळफास घेतल्याची घटना मंगळवार (ता.२८) सायंकाळी घडली. प्रल्हाद बनसोडे (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

बनसोडे आजारपणामुळे त्रस्त असल्याने मुळगाव जळगाव जिल्ह्यात बदलीसाठी प्रयत्नशील असल्याची माहिती समोर आली आहे. (Assistant Inspector took extreme step for Jalgaon transfer)

बनसोडे यांना जळगावला बदली हवी असल्याने अधिवेशन सुरु असताना त्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याने विधान सभेत याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाकोला पोलिस ठाण्यात कार्यरत सहायक निरीक्षक प्रल्हाद बनसोडे (वय-४२)यांची जळगावमधून मुंबईत बदली झाली होती.

कालिना बॉम्ब शोध पथकात ते कार्यरत होते. पोलीस वसाहतीच्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावर बनसोडे कुटुंबासह वास्तव्यास होते. मंगळवार(ता.२८) रोजी संध्याकाळी पाचच्या सुमारास वसाहतीच्या टेरेसवर जाऊन त्यांनी जीवन संपविले.

सुरक्षारक्षक अचानक छतावर गेल्यानंतर बनसोडे यांचा मृतदेह त्याला दिसला. त्याने स्थानिकांना माहिती देत पोलिसांना कळवले. प्रल्हाद बनसोडे यांच्या आत्महत्या प्रकरणी वाकोला पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. (latest marathi news)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panhala ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी मद्यधुंद, चक्कर आलेल्या रुग्णावरही उपचार होईना; धक्कादायक VIDEO VIRAL

Parli bypass traffic news: परळी बायपास रविवारीपासून बंद; रेल्वे रुळ व पुलाच्या कामामुळे मुख्य रस्त्यावर वाहतुकीचा ताण

Crime News: शिक्षकाचं दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको ते कृत्य, अंगावर झोपून अश्लील चाळे अन्...; घटनेनं रायगड हादरलं

Latest Marathi News Live Update : टोलानी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याचा मृत्यू, इतर विद्यार्थी आक्रमक; प्राचार्याच्या निलंबनाची मागणी

Dharur water crisis news: सहा पाणी योजना असूनही धारूरकरांना पाण्यासाठी भटकंती; वीस दिवसांपासून पुरवठा खंडित, ७५ वर्षांच्या आजीचा संघर्ष

SCROLL FOR NEXT