salary esakal
जळगाव

Jalgaon News: एसपी कार्यालयातील बाबुगिरीचा शासनाला फटका! दोन महिन्यापूर्वी निवृत्त कर्मचारी घेत राहिला वेतन

Latest Jalgaon News : जिल्‍हा पेालिस दलातील या रावसाहेब मंडळींचे प्रतापही काही कमी नाही. त्यातील एक नुकताच चर्चेत आला असून, आस्थापना शाखेच्या भोंगळ कारभारामुळे सेवानिवृत्त होऊनही दोन महिने हा पोलिस कर्मचारी ड्यूटी करीत राहिल्याचे आढळून आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्‍हा पोलिस दलातील बाबूगिरीचा फटका थेट राज्य शासनाच्या तिजोरीला बसला आहे. पोलिस दलातील एका कर्मचाऱ्याच्या जन्मतारखेचा घोळ संपूर्ण आयुष्य तसाच राहिला. इतकेच काय, तर तो दोन महिन्यांपूर्वीच निवृत्त झालायं, याचा साक्षात्कार नुकताच होऊन या कर्मचाऱ्याला सक्तीच्या निवृत्तीचे तोंड बघावे लागले. सोबत दोन महिन्याचे वेतनही त्याच्याकडून जमा करण्याचे निर्देश दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. (Employees who retired two months ago continued to receive salary)

पोलिस दलातून सात कर्मचारी सप्टेंबरअखेर निवृत्त झाले. त्यापैकी सोमवारी (ता. ३०) सहा कर्मचारी-अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येऊन त्यांना सन्मानाने बिदाई देण्यात आली. त्यात अमळनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील नंदवाळकर, धरणगावचे उपनिरीक्षक हिरामण महाले, यावलचेसहाय्यक फौजदार मजफ्फरखाँ शमसेरखाँ, पाचोऱ्याचे सहाय्यक फौजदार दिलीप अहिरे, मुख्यालयातील कर्मचारी कमलाकर राजहंस, मीराबाई जोशी यांचा समावेश आहे. यांच्यासोबत शेख हसन शेख जैनोद्दीन यांची निवृत्तीनिमित्त सत्कार होणार होता. मात्र, ऐन वेळेस गोंधळ उडून सत्कारार्थी निवृत्तांच्या यादीतून त्यांचे नाव वगळण्यात आले.

आस्थापना शाखेत भोंगळ कारभार

प्रशासनात धोरणात्मक कामे करताना बाबुगिरीचा मोठा उपद्रव सहन करावा लागतो. कुठलेच काम वेळेवर न होणे, विनाकारण टंगळमंगळ करणे, कर्मचाऱ्यांकडून चिरीमिरी घेऊन कामे करवून आणणे यासह शासकीय कार्यालयांमध्ये जनसामान्यांची होणारी पिळवणूक सुद्धा याच बाबुगिरीमुळे होते.

ही रावसाहेब मंडळी नावाप्रमाणेच आपली सत्ता-मर्जी कशी रेटायची हाच याचा प्रमुख उद्देश असतो. जिल्‍हा पेालिस दलातील या रावसाहेब मंडळींचे प्रतापही काही कमी नाही. त्यातील एक नुकताच चर्चेत आला असून, आस्थापना शाखेच्या भोंगळ कारभारामुळे सेवानिवृत्त होऊनही दोन महिने हा पोलिस कर्मचारी ड्यूटी करीत राहिल्याचे आढळून आले आहे. (latest marathi news)

सक्तीची सेवानिवृत्ती?

आजवर पोलिस खात्यात सक्तीची रजा, सक्तीची बदली असे होत होते. मात्र, महाराष्ट्र पोलिसदलाच्या इतिहासात प्रथमच शेख हसन शेख जैनोद्दीन या कर्मचाऱ्याला सक्तीच्या सेवानिवृत्तीला सामोरे जावे लागले आहे.

जन्म तारखेनुसार हा कर्मचारी जुलै-२४ मध्ये सेवानिवृत्त होणे अपेक्षित होते. मात्र, संबंधित शिटक्लर्क आणि इतर कर्मचारी अधिकाऱ्यांचे त्याच्या सेवानिवृत्तीकडे लक्षच गेले नाही. इतकेच नाही तर निवृत्तनंतर वेतनही पूर्ण मिळाले आणि ड्यूटीही करावी लागली, हे नवल.

सत्कारास मुकले

पोलिस दलात संपूर्ण आयुष्य घालविल्यानंतर, सेवानिवृत्तीचा दिवस हा खूप भावनिक आणि नव्या आयुष्याची नांदी घेऊन आलेला असतो. पोलिस दलात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा कुटुंबप्रमुख म्हणून पोलिस अधीक्षक, अप्पर अधीक्षकांच्या हस्ते सपत्नीक सत्कार होऊन मानापानाने विदाई केली जाते. मात्र, शेख हसन शेख जैनोद्दीन या कर्मचाऱ्यासह त्यांचे कुटुंबीय या सत्कारापासून वंचित राहिले असून, दोन महिने ड्यूटी करुनही त्यांना मिळालेले वेतन शासनाला परत करण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

"संबंधित कर्मचाऱ्याकडून त्याची जन्मतारीख चुकली असल्याचा अर्ज करण्यात आला होता. त्यांची सेवानिवृत्ती अगोदरच व्हायला हवी होती, त्यांच्या अर्जानुसार पडताळणी करण्यात येऊन त्यांची सेवानिवृत्ती करण्यात आली आहे."-संदीप गावित, उपविभागीय पोलिस अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

OBC Meeting: ओबीसी उपसमिती सर्व कुणबी प्रमाणपत्रांचा अभ्यास करणार; भुजबळांनी मुख्यमंत्र्यांकडे दिले पुरावे

Uddhav Thackeray: आता मी पुन्हा येईन, पुन्हा येईन नाहीतर मी नेहमी येईन... देवेंद्र फडणविसांना टोला लगावत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Velhe Accident : वेल्हे चेलाडी रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला महिलेचा बळी; रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अडीच महिन्यात गेला दुसरा बळी

Jalgaon News : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या वेतनातून वसूल होणार रक्कम; एमपीडीए कारवाईतील त्रुटी जळगाव प्रशासनाला पडल्या महागात

Samsung Galaxy Z Fold 6 स्मार्टफोनवर चक्क 50 हजारचा डिस्काउंट, किंमत झाली निम्म्यापेक्षा कमी, ऑफर पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT