Raver's banana union officials filled banana racks at the railway station here. A photograph of that time  esakal
जळगाव

Jalgaon News: रावेर येथूनच केळी वॅगन्स रॅक भरणार : युनियन अध्यक्ष रामदास पाटील; शेतकरी मंडळाशी समन्वयाने सहकार्याची भूमिका ठेवू

Jalgaon News : येथील फळबागायतदार शेतकरी मंडळ व केळी उत्पादकांत मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला असून, केळी उत्पादक शेतकऱ्यांसह केळी कामगारांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

निंभोरा/रावेर : रावेर येथील केळी उत्पादक शेतकरी व व्यापाऱ्यांनी इतिहासात प्रथमच निंभोरा रेल्वेस्थानकावर १६ व्हीपीयू केळी वॅगन्सचा रॅक भरले. यामुळे येथील फळबागायतदार शेतकरी मंडळ व केळी उत्पादकांत मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला असून, केळी उत्पादक शेतकऱ्यांसह केळी कामगारांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Banana wagons rack will be filled from Raver)

येथील रेल्वेस्थानकावर निंभोरा येथील फळबागायतदार शेतकरी मंडळाद्वारे व केळी उत्पादकांनी गेल्या जून महिन्यापासून केळी वॅगन रॅक सुरळीतपणे भरणे सुरू असताना शनिवारी (ता. ३) रावेर येथील व्यापाऱ्यांनी व युनियन पदाधिकाऱ्यांनी निंभोरा रेल्वेस्थानकावर इतिहासात प्रथमच केळी वॅगन्स रॅक भरल्याने निंभोरा येथील फळबागायतदार मंडळ व केळी उत्पादकांत नाराजी आहे.

याबाबत रावेर युनियनचे अध्यक्ष रामदास पाटील यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले, की निंभोरा येथील फळबागायतदार शेतकरी मंडळाला व केळी उत्पादकांना चुकीची व खोटी दिशाभूल करणारी माहिती दिली गेली असल्याने त्यांचा आमच्या संदर्भात गैरसमज झाला आहे. (latest marathi news)

श्री. पाटील यांनी निंभोरा फळबागायतदार शेतकरी मंडळाचे अध्यक्ष कडू चौधरी यांच्याशी चर्चा केली. निंभोरा फळबागायतदार शेतकरी मंडळाशी समन्वय साधून यापुढे सहकार्याची भूमिका ठेवू, असे त्यांनी आश्वस्त केले.

त्याचबरोबर यापुढे रावेर येथूनच केळी वॅगन्स रॅक भरणार असल्याने कोणीही गैरसमज करून घेऊ नये, आमच्याकडून कोणालाही आर्थिक व मानसिक नुकसान होईल, असा प्रयत्न नव्हता; परंतु काही कारणास्तव निंभोरा येथे रेल्वे वॅगन्स रॅक भरला गेला, यापुढे रावेर येथूनच केळी वॅगन्स रॅक भरले जातील, असे पाटील यांनी स्पष्ट सांगितले.

कामगारांचाही रोष

रावेर येथील शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी निंभोरा येथे रेल्वेस्थानकावर केळी वॅगनचा रॅक भरल्याने त्यांनी त्यासाठी लागणारे सर्व केळी कामगार रावेर येथूनच आणली होती. यामुळे निंभोरा येथील स्थानिक केळी कामगारांचा रोजगार बुडाला. त्याचा रोषही रावेरच्या उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT