Police team with Bholeasingh Bawari who fled the court. esakal
जळगाव

Jalgaon News : न्यायालयातून पळालेला भोला अटकेत; सिंधी कॉलनी भक्तनिवास परिसरात दडून बसला

Jalgaon : मध्यरात्री तीनच्या सुमारास घराकडे जात असताना, एमआयडीसी पोलिसांच्या गस्ती पथकाने अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : पोलिसांच्या हाती तुरी देत न्यायालयातून पळ काढलेला अट्टल गुन्हेगार भोलासिंग बावरी याला गुरुवारी (ता. १३) मध्यरात्री तीनच्या सुमारास घराकडे जात असताना, एमआयडीसी पोलिसांच्या गस्ती पथकाने अटक केली. दंगल, हाणामारी, लुटमार, घरफोड्या यांसह इतर गंभीर गुन्हे दाखल असलेल्या भोलासिंग जगदीशसिंग बावरी (वय ३२, रा. तांबापुरा, जळगाव) नुकताच कारागृहातून बाहेर पडला होता. ( Bhola who ran away from court arrested by police )

नंतर त्याने भंगार विक्रेत्याला मारहाण केल्याप्रकरणी शनिपेठ पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली. न्यायालयातून कारागृहात घेऊन जाण्यापूर्वीच भोलासिंग बावरी याने पळ काढला होता. शनिपेठ पोलिस ठाण्याचे पथक त्याचा शोध घेत होते. मात्र, रात्रभर तो मिळून आला नाही.

गुरुवारी (ता. १३) रात्री तीनच्या सुमारास लपतछपत सिंधी कॉलनी परिसरातून तांबापुराच्या दिशेने घरी जाताना एमआयडीसीच्या गस्ती पथकाच्या नजरेत तो आला. पोलिसांना पाहून पळून जाण्याच्या तयारीत असताना, उपनिरीक्षक दीपक जगदाळे, गणेश ठाकरे, सिद्धेश्वर डापकर, नरेंद्र मोरे, विनोद आस्कर यांनी त्याला पाठलाग करून ताब्यात घेतले. नंतर त्याला शनिपेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन सेटवर घसरून पडले, गुडघ्याला दुखापत; उभं राहता येईना, नेमकं काय घडलं?

Pune News: MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला ब्रेक; मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर २ ऑक्टोबरचे सत्याग्रह आंदोलन तात्पुरते स्थगित

Rohit Sharma Celebration : शतकानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनची चर्चा अन् सुनील गावस्कर काय म्हणाले ऐका Video Viral

Sharad Pawar Drought Tour : शरद पवार करणार दुष्काळ दौरा; पुणे जिल्ह्यातील तीन तालुक्यांना देणार भेट

SCROLL FOR NEXT