Rain water accumulate in the bus station esakal
जळगाव

Jalgaon Rain: पावासाने भुसावळ शहराची वाताहात! अनेकांच्या घरांत पाणी; रस्त्यावर ठिकठिकाणी डबके, बसस्थानकाला तलावाचे स्वरूप

Jalgaon News : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जामनेर रोड, खडका रोड, यावल व जळगाव मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

भुसावळ : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या सतंतधार व मुसळधार पावसामुळे शहराची पूर्तीवाताहात झाली आहे. पावसामुळे खराब झालेल्या शहरातील रस्त्यांवर पाण्याचे डबके साचलेले आहेत. त्यामधून वाहनधारकांना कमालीची कसरत करून वाहने चालवाली लागत आहेत. झोपडपट्टी भागातील अनेकांच्या घरांत पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. त्याचबरोबर बसस्थानकातसुद्धा पाणी साचल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. म्हणून याबाबत प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. (Bhusawal city weathered by rain puddles on road)

रहिवासी भागातील जलमय झालेले रस्ते.

गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जामनेर रोड, खडका रोड, यावल व जळगाव मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्या खड्यांत पाणी साचल्याने वाहनधारकांना अंदाज येत नसल्याने लहानमोठे अपघात होत आहेत. शहराच्या काही सखल भागातील झोपडपट्यांमध्ये पाणी शिरल्याच्यादेखील घटना घडल्या.

शहरातील मध्यवर्ती बसस्थानकातील बसगाड्या बाहेर जाणाऱ्या प्रवेशद्वारावरच पावसाचे पाणी साचल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. बसस्थानकातील वाहतुकीच्या रस्त्यात पावसामुळे खड्डे पडून पाणी मोठ्या प्रमाणात साचले असल्याने परिसराला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. दोन दिवसांपासून पाणी ‘जैसे थे’च असल्याने खड्ड्यांमुळे बसला ये-जा करताना अडथळा निर्माण होत आहे. प्रवाशांनादेखील ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

बसस्थानकाजवळच पडला खड्डा

भुसावळ बसस्थानकावरून बसगाड्या बाहेर पडणाऱ्या प्रवेशद्वाराच मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्डा पडला आहे. मागील पावसात नगरपालिका प्रशासनाने बसस्थानकात भराव टाकून काही प्रमाणात खड्डे बुजविले होते.

मात्र, यावेळी त्यावरील भराव वाहून गेल्याने परिस्थिती बिकट झालेली आहे. म्हणून बसस्थानकामधून बसगाड्या बाहेर व आत आणताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. शिवाय प्रवाशांनाही ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. (latest marathi news)

तातडीने दुरुस्ती करण्याची गरज!

भुसावळ बसस्थानक हे मध्यवर्तीय स्थानक आहे. त्यामुळे येथून रोज हाजरो प्रवाशी ये-जा करीत आहेत. त्यात महिलांना बस योजनेची सवलत असल्याने प्रवासांची संख्या वाढली आहे. मात्र, दोन दिवसांपासून बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. परंतु, तरीदेखील संबंधित प्रशासनाकडून अद्यापपर्यंत पाणी बाहेर काढण्याचे कोणतेच प्रयत्न करण्यात आलेले नाहीत.

त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अशास्थितीत अपघाताचा धोका ओळखून संबंधित विभागातील वरिष्ठांनी गांभीर्याने दखल घेऊन तातडीने बसस्थानक परिसरात साचलेले पाणी बाहेर काढण्याची गरज निर्माण झाली आहे.

"मागील काही दिवसांपूर्वी आमच्या विभागाने भराव टाकणे सुरू केले होते. मात्र, पाऊस सुरू झाल्याने भराव टाकण्याचे काम अर्धवट राहिले आहे. पाऊस थांबल्यास पुन्हा भराव टाकून नगरपालिकेकडून भराव टाकण्यासाठी जेसीबीची मदत घेऊन काम पूर्ण केले जाणार आहे."

- राकेश शिवदे, आगारप्रमुख, भुसावळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : सैलानी येथे दर्शनाला जात असलेल्या वाहनाचा अपघात

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT