Dr. during road stop movement due to digging of the road. Officer of Babasaheb Ambedkar Utsav Samiti.
Dr. during road stop movement due to digging of the road. Officer of Babasaheb Ambedkar Utsav Samiti. esakal
जळगाव

Jalgaon Protest News : भुसावळला ट्रकखाली डोके ठेवून आंदोलन! सणासुदीत रस्त्याचे खोदकाम केल्याने ‘रास्ता रोको’

प्रतीक जोशी

भुसावळ : शहरातील गांधी पुतळा ते महाराणा चौकातील दुभाजक रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाची वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत एक कोटी साठ लाख रुपयांची मंजुरी मिळाली होती. निधीअभावी काम रखडले होते. मात्र ऐन सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मक्तेदाराने रस्त्याचे खोदकाम सुरू केल्याने डॉ.'बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी अर्धा तास गांधी पुतळा चौकात रास्ता रोको करून समिती अध्यक्षांनी चक्क ट्रकच्या चाकाखाली डोके ठेवल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. (Jalgaon Bhusawal road stop movement)

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. उत्सव समिती अध्यक्ष गणेश सपकाळे (भुरा) तसेच कार्यकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या मार्गावर सुशोभीकरण व रोषणाईचे काम करीत असताना अचानक दोन ट्रॅक्टर ट्रॉली व दोन जेसीबी मशीन घेऊन चत्रभूज कन्ट्रक्शनचे मक्तेदार योगेश पाटील यांचे अभियंता तुषार वाघुळदे व जीवन सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली गांधी पुतळा ते महाराणा चौकमधील दुभाजक रस्त्याला खोदकाम करण्याचे काम करीत असताना.

उत्सव समिती अध्यक्ष व कार्यकर्ते यांनी खोदकाम करण्यासंदर्भात संबंधितांना विचारणा केली असता या मार्गावरील दुभाजक रस्ता काॅक्रिटीकरणाच्या कामाला वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत एक कोटी साठ लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे. हे काम निधीअभावी रखडले असल्याने पूर्ण होऊ शकले नाही. मात्र दहा टक्के निधी उपलब्ध झाल्याने कामास सुरवात केल्याचे चत्रभुज कन्ट्रक्शनचे मक्तेदार योगेश पाटील यांनी सांगितले.

रस्त्याचे खोदकाम शनिवारी (ता. ६) जेसोबी मशीनच्या साह्याने करीत असताना पथदीपाची केबल तुटल्याने कार्यकर्त्यांमध्ये अक्रोश निर्माण झाला. रस्त्याचे काम सुरू झाल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा मार्ग बंद करण्यात येईल, असा रोष मनात धरून उत्सव समिती अध्यक्ष गणेश सपकाळे व कार्यकर्त्यांनी चक्क गांधी पुतळा चौकात रास्ता रोको केल्याने पोलिसांची तारांबळ उडाली. (latest marathi news)

अखेर बाजारपेठ पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक गजानन पडघन यांनी घटनास्थळी पोहचून सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता चंद्रशेखर तायडे व मक्तेदारी योगेश पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला व खोदकाम करण्यात आलेला रस्ता पूर्ववत करून देण्यास सांगितल्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले.

"या रस्ता कॉंक्रिटीकरणाच्या कामाला वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजुरी मिळाली आहे. निधीअभावी काम पूर्ण होऊ शकले नाही. दहा टक्के निधी आल्याने कामास सुरवात करण्यात आली आहे."- योगेश पाटील, चत्रभुज कन्ट्रक्शनचे मक्तेदार

"रामनवमी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती काही दिवसांवर आल्याने लोकांच्या भावना दुखावल्या आहे. अधिकाऱ्यांशी चर्चा करून रस्त्याचे खोदकाम करायला हवे होते. वरिष्ठांशी चर्चा करून योग्य ती कारवाई केली जाईल."- गजानन पडघन, पोलिस निरीक्षक, भुसावळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress Boycott Exit Polls: मतदानोत्तर चाचणीच्या चर्चांवर काँग्रेसचा बहिष्कार; काँग्रेसनं का घेतला असा निर्णय?

Exit Polls 2024: एक्झिट पोल्स महत्वाचे आहेत का? 'या' कारणांमुळं चुकू शकतो अंदाज

IND vs BAN Playing 11 : सराव सामन्यातच ठरणार सलामी जोडी; बुमराहचा पार्टनर कोण असणार?

Virat Kohli : सेमी फायनल, फायनल आली की विराट.... मांजरेकर म्हणतात किंग कोहली टीम इंडियासाठी चिंतेचा विषय

Latest Marathi Live News Update: जीडीपीची आकडेवारी पाहून मोदींनी मानले कष्टकऱ्यांचे आभार

SCROLL FOR NEXT