birth
birth esakal
जळगाव

जळगाव : गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर तिळ्यांचा जन्म; बाळ-बाळंतीण सुखरूप

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) चोपडा शहरातील एका महिलेला दहा दिवसांपूर्वी चक्क ‘तिळे’ म्हणजे तीन मुले जन्माला आले होते. डॉक्टरांनी अत्यंत गुंतागुंतीची असलेली शस्त्रक्रिया करून महिलेची सुखरूप प्रसूती केली. रविवारी (ता. १४) महिलेसह तिन्ही बाळांना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या हस्ते साडी, फळे, शक्तिवर्धक औषधे देऊन रुग्णालयातून निरोप देण्यात आला. महिलेच्या तिन्ही बाळांना केशरी, पांढरा, हिरव्या रंगाचे कपडे घालून ‘तिरंगी’ सादरीकरण करून निरोप देण्यात आला. (Latest Marathi News)


संबंधित महिलेची प्रकृती अत्यंत गुंतागुंतीची होती. डॉक्टरांनी वैद्यकीय कौशल्य वापरून महिलेची यशस्वी शस्त्रक्रिया करून तिन्ही सुमारे २ किलो वजन असणाऱ्या बाळांना सुखरूपपणे बाहेर काढले. महिलेची प्रकृती सुधारल्यानंतर तसेच बाळांची प्रकृती उत्तम झाल्यावर निरोप देण्यात आला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड, मुख्य अधिसेविका प्रणिता गायकवाड, विभागप्रमुख डॉ. संजय बनसोडे, डॉ. नरेंद्र पाटील, डॉ. प्रदीप लोखंडे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. सोनाली मुपाडे, डॉ. हेमंत पाटील, डॉ. खुशाली राठोड, डॉ. श्रद्धा पाटील, डॉ. राजश्री येसगे, डॉ. निकिता सूर्यवंशी, डॉ. मोनिका येरमवार, डॉ. प्रणिता खरात, डॉ. पूजा बुजाडे, इन्चार्ज सिस्टर लता सावळे, सुवर्णा कांगाणे, भारती महाजन, संदीप सोनवणे, रेखा मोरे, कमल पवार, संपर्क सहायक विश्वजीत चौधरी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Oath Ceremony 2024: नरेंद्र मोदी घेणार तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ, ९ जून का आहे शुभ?

Marathi News Live Update: केंद्रीय मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी महाराष्ट्रातील खासदारांना फोन

FIFA World Cup Qualifying : कराविरुद्धच्या सामन्यासाठी ; भारतीय संघ जाहीर

Narendra Modi: अखेर विरोधी पक्षाच्या नेत्याला मिळालं शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण, आघाडीतील पक्षांशी चर्चा करून घेणार निर्णय

PM Modi Oath Ceremony : 'या' दोन दिग्गज नेत्यांना मंत्रिपदापासून दूर ठेवणं अशक्य; अखेर शपथविधीसाठी आला फोन

SCROLL FOR NEXT