A.T. Patil, Smita Wagh esakal
जळगाव

Jalgaon Lok Sabha Constituency : ‘ए.टीं’च्या गाठीभेटी; वाघांची धाकधूक!

Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदार संघात महायुतीतील भारतीय जनता पक्षातर्फे स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहिर करण्यात आली होती.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदार संघात महायुतीतील भारतीय जनता पक्षातर्फे स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहिर करण्यात आली होती. त्यानतंर आता महाविकास आघाडीतील शिवसेना उबाठा पक्षातर्फे करण बाळासाहेब पवार यांची उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. दोन्ही पक्षाचे उमेदवार जाहिर झाल्यामुळे लढतीचे चित्र स्पष्ट झाल्याचे दिसत होते. (Jalgaon Lok Sabha Constituency)

मात्र माजी खासदार ए.टी.पाटील यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या अंतर्गत भेटीगाठी घेणे सुरू केल्याने भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांची धाकधूक वाढल्याचे दिसून येत आहे. भारतीय जनता पक्षातर्फे माजी आमदार स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहिर झाली, त्यानंतर विरोधी शिवसेना ठाकरे गटातर्फे कुलभूषण पाटील,ललिता पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू होती.

तर दुसरीकडे भाजपमध्ये उमेदवारी नाकारण्यात आल्याने माजी खासदार उन्मेश पाटील यांची उघड नाराजी होती. त्या नाराजीतूनच उन्मेश पाटील यांनी पारोळ्याचे भाजपचे युवक पदाधिकारी व माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्यासह भाजपला रामराम करून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. (jalgaon political news)

त्यानंतर भाजपमधून शिवसेना ठाकरे गटात गेलेले युवा कार्यकर्ते करण पवार यांना जळगाव लोकसभेची उमेदवारी जाहिर करण्यात आली. आणि जळगाव लोकसभेतील लढतीचे चित्र एकदम पालटले. भारतीय जनता पक्षात फुट पडताच माजी खासदार ए. टी.पाटील यांनीही आपल्या पक्षातील उमेदवारीचा दावा प्रबळ केला आहे.

त्यांनी दिल्ली येथील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या असल्याचे सांगण्यात येत आहे. एकीकडे स्मिता वाघ यांचा प्रचार सुरु असताना दुसरीकडे ए.टी.पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणे सुरु केल्याने वाघ यांची धाकधूक वाढली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare On NCP: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार का? भवितव्य सांगून सुनील तटकरेंचं मोठं वक्तव्य; काय म्हणाले?

ENG vs ITA, T20 WC : इंग्लंडचा Super 8s मध्ये प्रवेश! इटलीने 'इंग्रंजां'ना शेवटपर्यंत झुंजवले, फुटबॉलच्या देशाने जिंकली मनं...

Ratnagiri CCTV Surveillanc : पोलिसांची तिसरी नजर होतेय धूसर; जिल्ह्यातील सीसीटीव्ही कॅमेरे; देखभाल दुरुस्तीचा गंभीर प्रश्न

Malegaon News : आता अवघ्या महाराष्ट्रात राबवणार 'मालेगाव शैक्षणिक पॅटर्न'; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा

Sunil Tatkare: अजितदादांचं विमान पाडलं की पडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT