Computer Operator Sudhakar Koli esakal
जळगाव

Jalgaon Bribe News : ऑपरेटर लाचेच्या जाळ्यात; ग्रामसेवक पसार

Jalgaon : स्वावलंबन योजनेचा निधी मंजूर झाल्याने बक्षीस म्हणून एक लाख रुपये लाच ग्रामसेवकाने सांगितल्यानुसार घेताना चुंचाळे ग्रामपंचायतीचा संगणक ऑपरेटर सुधाकर धुडकू कोळी यास जळगाव एसीबीने अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Bribe News : स्वावलंबन योजनेचा निधी मंजूर झाल्याने बक्षीस म्हणून एक लाख रुपये लाच ग्रामसेवकाने सांगितल्यानुसार घेताना चुंचाळे ग्रामपंचायतीचा संगणक ऑपरेटर सुधाकर धुडकू कोळी (वय ३५, चुंचाळे) यास जळगाव एसीबीने अटक केली. ग्रामसेवक हेमंत कमलाकर जोशी (चुंचाळे) हा मात्र पसार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहेत. हा सापळा शनिवारी (ता. १७) दुपारी एकच्या सुमारास यशस्वी करण्यात आला.

चुंचाळे येथील ४६ वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, चुंचाळे (ता. यावल) गावी त्यांच्या वडिलांच्या नावाची संस्था असून, त्यामध्ये पंधराव्या वित्त आयोगाच्या शिफारशीतून गावात शिलाई मशिन प्रशिक्षण देऊन ग्रामीण भागातील महिला व युवतींना स्वावलंबी करण्याबाबत केंद्र शासनाकडून दोन लाख रुपये निधी मंजूर झाला होता.

मंजूर निधीतून तब्बल ५० टक्के बक्षीस म्हणून एक लाखाची लाच ग्रामसेवक हेमंत जोशी यांनी शुक्रवारी (ता. १६) मागितली होती. तक्रारदाराने याबाबत शुक्रवारी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविल्यानंतर लाचेची पडताळणी करण्यात आली.

...यांनी केली कारवाई

हा सापळा जळगाव पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, नाईक बाळू मराठे.

सहाय्यक फौजदार सुरेश पाटील, नाईक सुनील वानखेडे, हवालदार रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने यशस्वी केला.

लाच स्वीकारताच झडप

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी सापळा रचल्यानंतर ग्रामसेवकाने लाचेची रक्कम ऑपरेटर यांच्याकडे देण्यास तक्रारदाराला सांगितल्यानंतर ऑपरेटर सुधाकर कोळी यांनी लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली, तर ग्रामसेवक हेमंत जोशी यांना सापळ्याबाबत कुणकूण लागताच ते पसार झाले. दोघांविरोधात यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirmala Nawale: निर्मला नवले यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी जबाबदारी; जिल्हा परिषद निवडणुकीत पराभवानंतरही संघटनेत स्थान

Uruli Kanchan Garbage: उरुळी कांचनमधील पद्मश्री मणिभाई देसाई कॉलेजच्या प्रवेशद्वारावर कचराकुंड्यांचे साम्राज्य; विद्यार्थ्यांचे ‘कचरा स्वागत’

Marathi News Live Updates : कपिल सिबल यांनी निवडणूक आयोगाकडून झालेली एक गंभीर चूक निदर्शनास आणून दिली - अनिल देसाई

Pune illegal hill cutting issue: पुण्यात टेकडीफोडीला लगाम घाला; बेकायदेशीर बांधकामे थांबवा, परवानग्या रद्द करण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे निर्देश

Pune Civic Tenders: महापालिकेच्या रखडलेल्या शेकडो कोटींच्या निविदा दोन दिवसांत मार्गी लावा; राजकीय दबावाला बळी न पडण्याचे स्थायी समिती अध्यक्षांचे आदेश

SCROLL FOR NEXT