accepting bribe crime esakal
जळगाव

Jalgaon Bribe Crime : राजुरा ग्रामसेवकासह शिपाई ‘एसीबी’ च्या जाळ्यात; फेरफार नाव लावण्यासाठी घेतली 6 हजारांची लाच

Bribe Crime : घर व प्लॉटवर आईचे नाव कमी करून तक्रारदार यांचे फेरफार नाव लावण्यासाठी तक्रारदाराने राजुरा ग्रामपंचायतीत अर्ज केला.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Bribe Crime : फेरफार नाव लावण्यासाठी तडजोडीअंती सहा हजारांची लाच स्वीकारताना मुक्ताईनगर तालुक्यातील राजुरा ग्रामसेवक मनोज सूर्यकांत घोडके (वय ३४) व शिपाई सचिन अशोक भोलाणकर (वय २३) यांना बुधवारी सायंकाळी जळगाव एसीबीने अटक केली. राजुरा गावातील ४२ वर्षीय तक्रारदार यांच्या आईच्या नावाचे घर व प्लॉट असून, त्यांना घर व प्लॉटवर आईचे नाव कमी करून तक्रारदार यांचे फेरफार नाव लावण्यासाठी तक्रारदाराने राजुरा ग्रामपंचायतीत अर्ज केला. ( bribe of 6 thousand was taken to change name)

तक्रारदार यांचे फेरफारवर नाव लावण्यासाठी ग्रामसेवकाने ११ हजारांची लाच बुधवारी (ता.१५) मागितली होती व त्याबाबत जळगाव एसीबीकडे तक्रार नोंदविण्यात आली. बुधवारी लाच पडताळणीत ११ हजारांची लाच मागणी केल्यानंतर ग्रामसेवकाने तडजोड करीत सहा हजारांची लाच शिपायाकडे देण्याचे सांगितले. शिपायाने लाच स्वीकारताच ग्रामसवेकालाही अटक करण्यात आली.

संशयितांविरोधात मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक अमोद वालझाडे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, प्रणेश ठाकूर, पोलिस कर्मचारी सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, राकेश दुसाने, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे आदींच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price Today: सौदी अरेबियाने पाइपलाइन बंद केली, कच्च्या तेलात तेजी; गणेश चतुर्थीला पेट्रोल-डिझेल अन् LPG चे दर किती?

Maratha Reservation: मुंबई पोलिसांची परवानगी नाकारली तरी जरांगे जाणारच; ‘आंदोलनस्थळी मरेन, पण सरकारपुढे गुडघे टेकणार नाही’

IND vs AFG: पहिल्या T20I पूर्वी 'जन गण मन'च्या आधी 'वंदे मातरम्' का वाजवलं गेलं? जाणून घ्या ऐतिहासिक घटनेमागचं कारण

Marathi News Live Updates : पुण्यातील मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती आगमन मिरवणुकीला सुरुवात

Maharashtra School Recruitment: शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज! राज्यात २८ हजारांहून अधिक पदे भरण्याचा मार्ग मोकळा, शिक्षकेतर भरतीचे नवे नियम जाहीर

SCROLL FOR NEXT