B.T. बियाणे उपलब्ध होणार मेअखेरीस sakal
जळगाव

जळगाव : B.T. बियाणे उपलब्ध होणार मेअखेरीस

खरिपात कपाशीचे क्षेत्र २० टक्क्यांनी वाढणार

राजेश नागरे

जळगाव : यंदा कपाशीला मिळालेला १३ हजारांचा विक्रमी भाव पाहता येत्या खरीप हंगामात कपाशीच्या क्षेत्रात वीस टक्के वाढ होणार आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे. साडेपाच लाखांपेक्षा अधिक हेक्टरवर कपाशीचा पेरा होईल, असा अंदाज आहे. दरम्यान, बागायती कापूस लागवडीसाठी शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली असली तरी बाजारपेठेत बी. टी. बियाणे २५ मेनंतरच विक्रेत्यांकडे दाखल होतील.

जूनच्या पहिल्या आठवड्यात त्याची विक्री होईल. यंदा बी. टी. २, रासायनिक खतांचे दर वाढणार असल्याचे अगोदरच जाहीर करण्यात आले आहे. खतांची एनवेळी टंचाई भासू नये, म्हणून यूरिया व डीईपी खतांचा स्टॉक करण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या आहेत.साडेपाच लाख हेक्टरवर कपाशी गत वर्षी खरीप हंगामात कपाशीला साडेआठ ते तेरा हजारांदरम्यान दर प्रतिक्विंटल मिळाला आहे. यामुळे शेतकरी यंदा कपाशीच्या लागवडीकडे वळतील. परिणामतः कपाशीच्या लागवडीत वीस ते पंचवीस टक्के वाढ होण्याची शक्यता आहे.

खतांचे दर वाढतील

जिल्ह्यात गत खरीप हंगामात दोन लाख ५० हजार टन खते लागली होती. आता एक लाख दोन हजार टन साठा शिल्लक आहे. तर जिल्ह्याला तीन लाख ३९ हजार टन खतांचे आवतन मिळणार आहे. रशिया- युक्रेन युद्धामुळे खतांच्या दरवाढीवर परिणाम होणार आहे. यामुळे अगोदरच शेतकऱ्यांनी खते विकत घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी खतांची खरेदी केली आहे. तरीही टंचाई जाणवू नये म्हणून यूरिया खतांचा ७७६० टन, डीईपीचा १७६० टन बफर स्टॉक करण्याचे आदेश कृषी विभागाला आहेत. खरीप हंगाम आढावा बैठक १ ते १५ मे दरम्यान घेण्याबाबत पत्र कृषी विभागाला नुकतेच प्राप्त झाले आहे. त्यानुसार आढावा बैठक घेण्याचे नियोजन सुरू असल्याचे सांगण्यात आले.

भविष्यातील पेरणीचे संभाव्य क्षेत्र असे :

कापूस- पाच लाख ५० हजार हेक्टर, मका- ७० हजार, ज्वारी- ३५ हजार, उडीद, मूग, तूर मिळून ६० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : शक्तीपीठ विरोधात १३ जिल्ह्यांत जमीन मोजणीला वेग?, लातूर, हिंगोलीतून विरोधक एकवटणार; कोल्हापुरातील बैठकीत नेमकं काय घडलं

Mumbai: पनवेल-कर्जत लोकल लवकरच सुरु होणार, दररोज ५० गाड्या धावणार; प्रवाशांना दिलासा मिळणार!

Congress High Drama : "कसले अध्यक्ष?"; विचारताच काँग्रेस कार्यालयात तुफान राडा, नेत्यांवर थेट चप्पल-बुटांचा मारा!

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याच्या मतमोजणीसाठी वाहतुकीत बदल; बारामती-निरा मार्गावरील रस्ता २४ तास बंद, नेमका कसा असेल बदल?

Maharashtra Live News : मुंबईत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जोरदार आंदोलन

SCROLL FOR NEXT