crime fraud news  esakal
जळगाव

गुजरातच्या ठगबाजाकडून जळगावच्या व्यापाऱ्याची फसवणूक

अहमदाबादमधील कंपनीच्या मालकाविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील कासमवाडी परिसरात राहणाऱ्या व्यापाऱ्याची चार लाख २३ हजार ८५० रुपयांत फसवणूक झाली. अहमदाबादमधील कंपनीच्या मालकाविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Marathi News)

अहमदाबाद येथील अंबिका इंजिनिअर्स कंपनीकडून मुकेश मिस्त्री १८ जानेवारीला पुष्पलता बेंडाळे चौकातील व्यवसायिक हमीद युसूफ कच्छी यांच्याकडे आला होता. ‘टोमेटीक लोड सेल बेस फाइव्ह हेड लिक्वीड फिलींग’ हे यंत्र हमीद यांच्या कंपनीस विकण्याबाबत दोघांमध्ये करार झाला. त्यापेाटी अग्रीम रक्कम म्हणून हमीद कच्छी यांनी त्याला ३५ टक्के अर्थात चार लाख २३ हजार ८५० रुपये ॲक्सीस बँक खात्यातून अंबिका इंजिनिअर्सच्या इंडियन बँकेच्या खात्यात जमा केले. मात्र, सात महिने उलटूनही मशीन मिळाले नाही.

शेवटी हमीद कच्छी यांनी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी फिर्याद दिली. त्यावरून शनिपेठ पोलिस ठाण्यात मुकेश मिस्त्रीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक प्रदीप बोरूडे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुरात वाहून गेला हत्ती! नागालँडमधून १०० किमी दूर पोहोचला आसामला, वनविभागाच्या प्रयत्नामुळे वाचला जीव

Jantar Mantar: देशातल्या 'या' शहरांमध्ये आहे दिल्लीसारखं जंतर-मंतर! वाचा वेधशाळांचा रंजक इतिहास!

Latest Marathi News Update : मुंबई लोकलमध्ये थरार, विलेपार्ले स्थानकात ५ स्फोटांचा आवाज

Koyna Dam: कोयना धरणात २४ तासांत ३ टीएमसी पाण्याची भर; पाणीसाठा ७५ टीएमसीवर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पेपर लीक आंदोलनानंतर दिल्लीत E20 इंधन धोरणाविरोधात टॅक्सी संघटनांचा एल्गार; 4 ऑगस्टला संसद मार्चची घोषणा!

SCROLL FOR NEXT