Fraud Crime  esakal
जळगाव

Jalgaon Fraud Crime : जवानांच्या वैद्यकीय तपासणीच्या नावे डॉक्टराला गंडा

Fraud Crime : २१ मेस झालेल्या या प्रकाराविरुद्ध १० जूनला जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Fraud Crime : भारतीय सैन्यातील जवानांची वैद्यकीय तपासणी करायचे सांगून फोन-पेची संपूर्ण माहिती घेऊन डॉ. सुजाता प्रमोद महाजन (वय ६२, रा. गांधीनगर, जिल्हा पेठ) यांची एक लाख २४ हजार ९९२ रुपयांमध्ये फसवणूक करण्यात आली. २१ मेस झालेल्या या प्रकाराविरुद्ध १० जूनला जिल्हापेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गांधीनगरात डॉ. सुजाता महाजन यांचे हॉस्पिटल असून, २० मेस त्यांच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला. (case of fraud has been registered by asking for medical examination of Indian army personnel )

मी सैन्य दलातील अधिकारी बोलत असून, तुमच्याकडे जवानांची वैद्यकीय तपासणी करायचे असल्याचे सांगितले. त्यासाठी त्याने व्हिजिटिंग कार्ड मागविले. त्यानुसार डॉक्टरांच्या चालकाने त्याच्या मोबाईलवरून कार्ड पाठविले. दुसऱ्या दिवशी डॉ. प्रमोद महाजन यांना ४० ते ५० जवानांची तपासणी करायचे त्याने असल्याचे सांगितले. डॉ. प्रमोद महाजन यांनी पत्नी डॉ. सुजाता महाजन यांचा फोन-पे क्रमांक त्याला दिला.

बोलणे सुरू असताना, फोन-पे ॲपवर डॉ. सुजाता महाजन यांच्या बँक खात्यातून पैसे ट्रान्सफर होऊ लागले. काही वेळातच त्यांच्या खात्यातून एक लाख २४ हजार ९९२ रुपये विड्रॉल करण्यात आले. याबाबत डॉ. सुजाता महाजन यांनी १० जूनला दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT