Upazila Hospital Taluka Medical Officer Dr. Rohini Khadse showing the quality of medicinal pills in front of Yogesh Rane. Neighbor officials and activists. esakal
जळगाव

Jalgaon News : मुक्ताईनगर रुग्णालयात निकृष्ट दर्जाच्या औषधी गोळ्या; रोहिणी खडसेंकडून तपासणी

Jalgaon : नागरिकांच्या तक्रारीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र) पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी भेट दिली.

सकाळ वृत्तसेवा

मुक्ताईनगर : उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या गोळ्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचे आढळून आले आहे. नागरिकांच्या तक्रारीवरून राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र) पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी भेट दिली. औषधांची तपासणी केली असता, गोळ्या खरच निकृष्ट दर्जाच्या असल्याचे आढळून आले. रुग्णालयात निकृष्ट औषध पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी रोहिणी खडसे यांनी केली. (Checkup by Rohini Khadse of substandard medicines pills in Muktainagar hospital )

दरम्यान, येथे आढळून आलेली गोळ्यांची पाकिटे आर्द्रतेमुळे खराब झाली असून, ती तातडीने बदलविण्याचे आदेश दिल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांनी सांगितले. येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना निकृष्ट दर्जाची औषधे दिले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी रोहिणी खडसे यांच्याकडे केल्या होत्या. त्या अनुषंगाने शुक्रवारी (ता. ११) रोहिणी खडसे यांनी भेट दिली आणि औषधांची तपासणी केली.

तपासणीत औषधी निकृष्ट असल्याचे आढळून आले. काही गोळ्यांच्या वेष्टनातून काढताना चुरा होतो. काही वेष्टनांमध्ये गोळ्या न भरता चुराच भरल्याचे आढळून आल्याचे रोहिणी खडसे यांनी सांगितले. एकीकडे शासन नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा पुरवत असल्याचा दावा करते आणि दुसरीकडे निकृष्ट दर्जाच्या औषधांचा पुरवठा करून सरकार गरीब रुग्णांच्या जिवाशी खेळ करीत आहे, असा आरोप रोहिणी खडसे यांनी केला. (latest marathi news)

''निकृष्ट औषध पुरवठ्याची चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करावी, अशी आमची मागणी केली आहे. तसेच शासनाचा लाडके भाऊ असलेले पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना या निकृष्ट गोळ्या लाडक्या बहिणीचा नात्याने भेट देऊन निषेध नोंदविणार आहे.''-ॲड. रोहिणी खडसे

''उपजिल्हा रुग्णालयातील संबंधित औषधी ‘बी कॉम्पलेक्स’च्या गोळ्या होत्या. आर्द्रतेमुळे गोळ्यांची पाकिटे खराब झाली आहेत. ही संपूर्ण औषधी संबंधित यंत्रणेला तातडीने परत करण्याचे आदेश दिले आहेत. इतर सर्व औषधी सुस्थितीत व चांगल्या दर्जाची आहेत.''- डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

Vijay Pawar: बीड लैंगिक छळ प्रकरणातल्या विजय पवारचे कारनामे! RTE कायद्याला जुमानत नव्हता, सरकारी कार्यालयात घातला होता गोंधळ

Indian Railways New Menu : रेल्वे मंत्रालयानं जाहीर केलेलं नवं ‘मेन्यू कार्ड’ तुम्ही पाहिलं का?

SCROLL FOR NEXT