MSRTC esakal
जळगाव

Jalgaon News : चोपडा आगारास मिळाले 34 लाखांचे विक्रमी उत्पन्न! पंढरपूर वारीतून साडेचौदा लाखांचा नफा

Jalgaon News : आषाढी पंढरपूर यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारातून १० ते २० जुलै दरम्यान भाविकांसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या.

सकाळ वृत्तसेवा

चोपडा : पंढरपूर यात्रेसाठी चोपडा आगारातून भाविकांसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. यातून आगाराला ३३ लाख ७८ हजार ८२५ उत्पन्न मिळाले असून, आगारास सवलतीसह १४ लाख ५६ हजारांचा नफा झाल्याची माहिती आगारप्रमुख महेंद्र पाटील यांनी दिली. (Jalgaon Chopra Agar got record income of 34 lakhs)

आषाढी पंढरपूर यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या चोपडा आगारातून १० ते २० जुलै दरम्यान भाविकांसाठी जादा बसेस सोडण्यात आल्या होत्या. यात चोपडा आगाराला जवळपास ३४ लाखाचे विक्रमी उत्पन्न मिळाले आहे. यात्रेदरम्यान आगारातून ४८ वाहने ११२ फेऱ्या, ५२ हजार ८६२ किलोमीटर करून सवलतीसह ३३ लाख ७८ हजार ८२५ उत्पन्न मिळाले.

सवलतीसह उत्पन्न प्रती किलोमीटर ६३.९१ सवलतीसह भारमान १०० टक्के एकूण १० हजार ५१३ प्रवाशांनी प्रवास केला. यामुळे आगारास सवलतीसह १४ लाख ५६ हजारांचा नफा झाला, अशी माहिती आगारप्रमुख महेंद्र पाटील यांनी दिली. (latest marathi news)

चोपडा आगारास विक्रमी उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे चालक, वाहक, यांत्रिक व प्रशासकीय कर्मचाऱ्यांचे आगारप्रमुख महेंद्र पाटील यांनी अभिनंदन केले व आभार मानले. भविष्यात देखील अशीच उत्कृष्ट कामगिरी सातत्याने टिकविण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT