A biker with a handkerchief tied around his mouth as the heat increases esakal
जळगाव

Jalgaon Summer : जळगाव शहर तप्त उन्हाच्या लाटेत...! तापमानाची वाटचाल 45 अंशाकडे

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Summer : गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्याने तापमान ४० अंशांच्या आत होते. मात्र, सोमवार (ता. ८)पासून तापमान वाढण्यास सुरवात झाली आहे. मंगळवारी (ता. ९) तापमानाने चाळिशी पार करीत ४३.३ अंशांपर्यंत मजल मारली.

बुधवारी (ता. १०) ४४.६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली. (Jalgaon city in hot summer wave Temperatures move toward 45 degrees)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मंगळवारप्रमाणचे बुधवारी सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत होते. दुपारी बारा ते एकदरम्यान तापमान ४१ ते ४२ अंश होते. तीन ते चारदरम्यान तापमान ४४.५ अंश होते. सायंकाळी ते पुन्हा ४२ अंशावर खाली आले.

तापमानाची तीव्रता पाहून उन्हाची दाह सोसवत नव्हती. शहरातील अनेक ठिकाणचे रस्ते ओस पडले होते. नागरिक डोक्याला रूमाल बांधून बाहेर पडत होते. उन्हापासून गारवा मिळण्यासाठी नागरिक ऊसाचा रस, आइस्क्रीम, बर्फचा गोळा, शरबत, ताक, इतर शीतपेयांचा आस्वाद घेताना दिसत होते. बाजारपेठेत दुपारी शुकशुकाट होता.

ममुराबाद तापमान मापक केंद्रावर ४४.६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली असली, तरी हवामान अभ्यासक नीलेश गोरे यांच्या नोंदीनुसार सर्व तालुक्यांचे तापमान ४४ अंश असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT