crime esakal
जळगाव

Jalgaon News : शेतीच्या हिस्स्यावरून 2 गटांत हाणामारी; दहिवद शिवारातील घटना

Jalgaon : शेतीच्या हिस्स्यावरून दोन गटांत हाणामारी झाली. त्यात तीनजण जखमी झाले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शेतीच्या हिस्स्यावरून दोन गटांत हाणामारी झाली. त्यात तीनजण जखमी झाले. ही घटना काल गुरुवारी (ता.१३) सकाळी साडेदहा वाजता तालुक्यातील दहिवद शिवारात घडली. दरम्यान, दोन्ही गटांच्या एकूण नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमल रमेश पाटील यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता त्या आपल्या कुटुंबीयांसह दहिवद शिवारातील गट क्रमांम ४६०मध्ये शेती काम करीत होत्या. ( Clashes between 2 groups over farm incident in Dahiwad )

त्याचवेळी नीता जितेंद्र पाटील जवळ आली व शिवीगाळ करू लागली. ही शेती आमची आहे, तुम्ही का करता, म्हणून दमबाजी करू लागली. तेव्हा जितेंद्र सुभाष पाटील आला व त्याने हातातील लोखंडी सळईने डोक्यात मारले. त्यावेळी मुलगा अधिकार पाटील, सून कविता पाटील व मुलगी अनिता पाटील भांडण आवरायला आले. मात्र, त्यांनाही जितेंद्र पाटील व त्याचा मुलगा मयूर पाटील यांनी चापट बुक्क्यांनी मारले. दवाखान्यात उपचार केल्यानंतर विमल पाटील यांनी आज फिर्याद दिली.

त्यावरून जितेंद्र पाटील, नीता पाटील व मयूर पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गटातर्फे नीता जितेंद्र पाटील यांनी फिर्याद दिली. त्यानुसार गुरुवारी मी शेतात काम करीत होती. त्यावेळी आमचे भाऊबंद अधिकार रमेश पाटील, विमल रमेश पाटील, कविता अधिकार पाटील, मयूर अधिकार पाटील (सर्व रा. दहिवद), अनिता विनोद पाटील व विनोद प्रकाश पाटील (रा. कापडणे ता. जि. धुळे) हे हातात लाठ्याकाठ्या घेऊन आले.

शेती आमची आहे, तुम्ही करायची नाही, असे सांगत शिवीगाळ करू लागले. त्यांना शिवीगाळ करू नका, म्हणून सांगितले. मात्र, विमल, अनिता, कविता यांनी माझ्या डोक्यावर, हातावर काठ्यांनी मारहाण केली. भांडण आवरण्यासाठी माझे पती, मुलगा आले. मात्र, त्यांनाही मयूर अधिकार पाटील, अधिकार पाटील व विनोद पाटील यांनी काठ्यांनी पाठीवर, हातावर, पायावर मारहाण केली.

पुन्हा शेतात पाय ठेवला, तर जीवानिशी मारून टाकू, अशी धमकी दिली. दवाखान्यात उपचार घेऊन आल्यावर विमल, अधिकार, कविता, अनिता, मयूर यांच्याविरुद्ध फिर्याद दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही गुन्ह्यांचा तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Navy Sailor Family Death: नौदलाच्या खलाशासह पत्नी अन् २ मुलांचे मृतदेह आढळले घरात, २ महिन्यांच्या चिमुकल्याचा समावेश

Raigad News: महाड MIDCमध्ये पुन्हा गॅसगळती, एका कामगाराचा मृत्यू, ८ जण जखमी

Viral Video : तीन वर्षांचा चिमुकला आईची तक्रार घेऊन थेट पोलीस चौकीत पोहोचला, म्हणाला- तिला जेलमध्ये टाका; कारण ऐकून पोलिसांनाही आवरेना हसू

Marathi News Live Updates : हडपसर, मांजरी, फुरसुंगीत जोरदार पावसाला सुरुवात

IND vs SL 1st Test : एकही चेंडू न खेळता, भारत-श्रीलंकेचे खेळाडू जेवायला गेले! गौतम गंभीरचं डोकं फिरलं; गॉलवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT