Bullock cart race (file photo) esakal
जळगाव

Jalgaon News : विनापरवानगी बैलगाडी शर्यतीवर गुन्हा : जिल्हाधिकारी

Jalgaon : जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीसाठी जिल्हाधिकारी अटी व शर्तीसह मान्यता देण्यात येईल अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शामकांत पाटील यांनी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीसाठी जिल्हाधिकारी अटी व शर्तीसह मान्यता देण्यात येईल अशी माहिती पशुसंवर्धन विभागाचे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शामकांत पाटील यांनी दिली.

सर्वोच्च न्यायालयाच्या विस्तारित घटनापीठाने प्राण्यांसंर्दभात अधिनियम २०१७ मधील तरतुदी आणि महाराष्ट्र प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत २०१७ मध्ये नियम केले आहे. (Offense on bullock cart race without permission)

निश्चित केलेल्या अटी-शर्तींनुसार राज्यात बैलगाडी शर्यतीला परवानगी दिली जाते. संस्कृती व परंपरेनुसार साजरे करण्यात येणाऱ्या यात्रा, जत्रा, उत्सवात बैलगाडी शर्यती, शंकरपट, छकडा अशा १०० मीटर पेक्षा कमी अंतर असलेल्याच शर्यतीस परवानगी आहे.

बैलगाडी शर्यत घेऊ इच्छिणाऱ्यांना विहित नमुन्यात बँक हमी किंवा मुदत ठेव पावतीसह ५० हजाराच्या प्रतिभूती ठेवीसह जिल्हाधिकारी यांच्याकडे किमान १५ दिवस आधी अर्ज करावा. बैलगाडी शर्यतीच्या काळात नायब तहसीलदार व पोलिस उप-निरीक्षक दर्जाच्या दोन अधिकारी निरीक्षक म्हणून नेमावे.

नियमांचे उल्लंघन आढळल्यास निरीक्षक शर्यती थांबवू शकतील. शर्यतीत भाग घेणाऱ्या बैल/वळूच्या नोंदणी, पशुवैद्यकामार्फत तपासणी,फिटनेस प्रमाणपत्र आणि डिजिटल चित्रीकरणाचे नियम आहेत.

परवानगीच्या नियम-अटींचे उल्लंघन झाल्यास शर्यतीवर प्रतिबंधाची तरतूद आहे. शर्यतीत प्राण्यांना वेदना किंवा यातना देणाऱ्यास पाच लाख रुपये दंड किंवा तीन वर्षाच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असेल.

"जिल्ह्यात विनापरवानगी बैलगाडी शर्यती घेऊ नयेत. तसे होत असल्याचे अथवा झाल्याचे निदर्शनास आल्यास अथवा अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास चौकशी करून संबंधितावर तत्काळ गुन्हा दाखल करण्यात येईल."- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway Toll Collection : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अपूर्ण, टोल वसुली सुरू; नितीन गडकरींच्या आवाहनाला केराची टोपली

लाईव्ह सामन्यात रवी शास्त्रींची मोठी चूक! नाणेफेकीच्या वेळी शुभमन गिलला काय बोलले?

Child Rescue Operation: पंजाबमध्ये कूपनलिकेतून नऊ तासांनंतर मुलगा बाहेर; घराबाहेर खेळताना पडला होता खड्ड्यात, होशियारपूरमध्ये थरारक रेस्क्यू ऑपरेशन!

Rajdhani Express धावत्या राजधानी एक्सप्रेसमध्ये आगीचा भडका, एसी कोच जळून खाक

Amravati : अतिक्रमणातील चहाटपऱ्या काढल्याचा राग, पठ्ठ्या सिलिंडर घेऊन थेट पाण्याच्या टाकीवर चढला अन ....

SCROLL FOR NEXT