Ongoing construction of Talathi office at Pahan. esakal
जळगाव

Jalgaon News : पहाण तलाठी कार्यालयाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे! शाखा अभियंत्यांचे दुर्लक्ष असल्याचा पाटील यांचा आरोप

Jalgaon News : या कामाच्या सुरुवातीपासूनच पायाच्या फुटींगा टाकण्यापासून ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याच्या तक्रारी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांकडे केल्या.

सकाळ वृत्तसेवा

नांद्रा (ता.पाचोरा) : पहाण येथील नवीन तलाठी कार्यालयाचे स्वतंत्र कार्यालय मंजूर झाले आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून बांधकामाला सुरुवातही झाली आहे. मात्र, या कामाच्या सुरुवातीपासूनच पायाच्या फुटींगा टाकण्यापासून ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याच्या तक्रारी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंत्यांकडे केल्या. मात्र, तरीही ते ठेकेदारास पाठीशी घालत असल्याची तक्रार पहाण येथील सरपंच यांचे पती वाल्मीक पाटील यांनी केली आहे. (Jalgaon Construction of Pahan Talathi office of poor quality news)

संबधित तलाठी कार्यालयाच्या नव्याने उभारण्यात येत असलेल्या इमारतीवर गेल्या नऊ मे रोजी सकाळी स्लॅब टाकण्यात आला, तोही दर्जाहीन आहे. त्यावर पाणी मारण्यासाठीही दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत कोणीच आले नसल्याचे वाल्मीक पाटील यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

नांद्रा जिल्हा परिषद गटात तलाठी कार्यालयाचे पाच, तर एक मंडळ कार्यालय असे सहा गावांना ही कामे सुरू आहेत. त्यात नांद्रा येथे ९३ स्क्वेअर मीटरचे तलाठीसह मंडळ कार्यालय, तर कुरंगी, सामनेर, पहाण, दहिगाव, लासगाव या ठिकाणी ६६.४० स्केअर मीटरचे तलाठी कार्यालयाचे कामे भरउन्हाळ्यात सुरू आहेत.

"आजपर्यंत मला जेव्हा जेव्हा पहाण येथील सरपंच यांनी फोन केला किंवा माहिती मागितली. ती मी त्यांना दिली. काल स्लॅब टाकण्यात आला. आज अक्षय तृतीया असल्याने मजूर हे सकाळी पाण्याचे आळे बनविण्यासाठी दुपारी आले."

- काजवे, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाचोरा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! आई-वडिलांकडे दुर्लक्ष कराल तर पगार कापणार, राज्य सरकारची महत्त्वाची घोषणा, नेमका कायदा काय?

IND vs AUS 1st ODI Live: रोहित, विराटच्या पुनरागमनाचा फुसका बार... ऑस्ट्रेलियाच्या डावपेचांसमोर भारताची हार! मालिकेत आघाडी

IND vs AUS: अर्शदीपने ट्रॅव्हिस हेडचा अडथळा दूर केला, तर रोहित शर्माने सोपा झेल टिपला; भारताला कशा मिळाल्या दोन विकेट्स, पाहा Video

"तर माहेरची साडी 200 दिवस चालला असता" निर्माते विजय कोंडके यांचा धक्कादायक खुलासा ; "विक्रम आणि अजिंक्यने.."

ठरलं! निवडणूक आयोगाविरोधात विरोधक मैदानात उतरणार, १ नोव्हेंबरला मुंबईत महामोर्चाचं आयोजन, ठाकरे बंधू राहणार उपस्थित

SCROLL FOR NEXT