Crime esakal
जळगाव

Jalgaon Bribe Crime : विद्युत निरीक्षकाच्या झाडाझडतीत लाखोंचे ‘घबाड’; लाचप्रकरणी कारवाई

Jalgaon : विद्युत कंत्राटदाराचा परवाना नुतणीकरणासाठी १५ हजार रुपयांची लाच घेणारा उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाचा विद्युत निरीक्षक गणेश नागो सुरळकर याला न्यायालयाने तीन दिवसांच्या रिमांडवर पाठवले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Bribe Crime : विद्युत कंत्राटदाराचा परवाना नुतणीकरणासाठी १५ हजार रुपयांची लाच घेणारा उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाचा विद्युत निरीक्षक गणेश नागो सुरळकर (५२, रा. पार्वती नगर) याला न्यायालयाने तीन दिवसांच्या रिमांडवर पाठवले आहे. या लाचखोर अधिकाऱ्याच्या कार्यालयात ६८ हजार ५०० रुपये, तर घरझडतीमध्ये दोन लाख सात हजार ५५० रुपये रोख व ४८९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आढळून आले आहे. (Jalgaon court sent electrical inspector to three days remand for taking a bribe)

विद्युत कामे करणाऱ्या परवानाधारक कंत्राटदाराकडून परवाना नुतनीकरणासाठी १५ हजारांची लाच घेताना विद्युत निरीक्षक गणेश सुरळकर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवार(ता.२७) रोजी रात्री रंगेहाथ पकडले होते.

अशी रोकड जप्त

अटकेनंतर कार्यालयातील कपाटाच्या ड्रॉवरमध्ये ६८ हजार ५०० रुपये आढळून आले. तर, घर झडतीमध्ये २ लाख ७ हजार ५५० रुपये तसेच ४८९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आढळून आल्याने पंचनामा करुन ते जप्त करण्यात आले आहे. सापडलेली रोकड आणि दागिन्यांबाबत सुरळकर याच्याकडून अद्याप कुठलीच माहिती तपास यंत्रणेला मिळू शकलेली नाही.

पत्नीही लखपती

लाचखोर सुरळकर याच्या पत्नीचे नावे एमआयडीसी परिसरात कंपनीचे शेड(शेल्टर हाऊस) असल्याचीही माहिती समोर आली आहे. त्याविषयी अधिक चौकशी केली जाणार असून आज बुधवारी (ता.२८) सुरळकरला न्या. जे.जे. मोहिते यांच्या न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांच्या पोलिस रिमांडवर पाठवण्याचे आदेश दिले. सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. सुरेंद्र काबरा यांनी कामकाज पाहिले. (latest marathi news)

कोठडीचे कारणे

- तक्रारदार रोहित कोगटा यांचा विद्युत कंत्राटदार परवाना नुतनीकरणासाठी उपलब्ध दस्तावेज संशयीताकडून हस्तगत करून तपास करणे.

- यापूर्वीही संशयितांकडून इतर कंत्राटदारांना त्रास देत पैशांची मागणी करुन लाच स्वीकारली आहे का?

- कार्यालय व घरून जप्त केलेल्या रक्कमे बाबत खात्रीलायक माहिती संशयीत देत नाही. त्याबाबत अधिक तपास करणे आहे.

- पत्नीच्या नावे असलेल्या कंपनी शेड असल्याची माहिती असून त्या बाबत तपास करणे सुरु आहे.

- या कारणांसाठी लाचलुचपत विभागाने सुरळकर यांच्या कोठडीची केलेली मागणी न्यायालयाने ग्राह्य धरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT