Court Order esakal
जळगाव

Jalgaon Crime News : मुलाच्या हत्येप्रकरणी आरोपीला जन्मठेप! विखरण येथील महिलेची पुराव्याअभावी सुटका

Latest Crime News : या खून खटल्यात मयताच्या आई मंगलाबाई विलास पाटील (वय३५)हिची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश जिल्‍हा न्यायालयाने दिले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पुरुषोत्तम ऊर्फ प्रशांत विलास पाटील (वय १५, रा.जलाराम नगर, सावखेडा शिवार) याच्या खूनप्रकरणात मयताच्या आईचा प्रियकर प्रमोद जयदेव शिंपी (वय ३८, रा. विखरण, ता. एरंडोल) याला जिल्‍हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खून खटल्यात मयताच्या आई मंगलाबाई विलास पाटील (वय३५)हिची सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश जिल्‍हा न्यायालयाने दिले. (Accused in murder of child sentenced to life imprisonment)

मंगलाबाई पाटील व प्रमोद शिंपी यांच्यातील अनैतिक संबंधाची कुणकुण मंगलाबाईचा मुलगा पुरुषोत्तम याला लागल्याने त्याने आईला हा प्रकार बंद करायला सांगितला, मात्र प्रेमात आंधळ्या झालेल्या मंगलाबाई व प्रमोद यांनी पुरुषोत्तमच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करुन त्याचा कायमचा काटा काढण्याचा निर्णय घेतला. दोघांच्या कट कारस्थानानुसार १६ जानेवारी २०२२ रोजी रावेर येथे कबुतर ठेवण्याचा पिंजरा घ्यायला जायचे सांगून दोघांनी त्याला मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूरच्या जंगलात नेले.

आसिरगड (ता.बऱ्हाणपूर) किल्ल्याच्या परिसरातील जंगलात नेऊन तेथे गळा आवळून त्याचा खून करण्यात आला. नंतर गळफास घेतल्याचा देखावा करून पुरुषोत्तमचा मृतदेह झाडाला लटकवून दोघांनी पळ काढला. दुसऱ्या दिवशी मुलगा सापडत नसल्याने वडील विलास नामदेव पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात हरविल्याची तक्रार दिली होती.

तपासात गुन्हा कबूल

पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर तपासाचे धागेदोरे हाती लागल्यावर प्रमोद शिंपी याला ताब्यात घेतले. त्यास खाकीचा हिसका दाखविला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने मंगलाबाईला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून प्रमोद शिंपी हा कोठडीत होता तर मंगलाबाईला जामीन मंजूर करण्यात आल्याने त्या बाहेर होत्या. (latest marathi news)

सतरा महत्त्वपूर्ण साक्षीची नोंद

जिल्‍हा सत्र न्यायाधीश एस.एन.राजूरकर यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज सुरु होते. खुनाच्या घटनेला प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतांना तपासाधिकारी, सरकारी अभियोक्ता ॲड. प्रदिप महाजन यांनी १७ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या. साक्ष नोंदवताना प्रमोद शिंपीचा मित्र, जळगाव शहरातील तत्कालीन कोतवाल, तांत्रिक पुराव्यांची माहितीचे पृथक्करण करणारे तंत्रज्ञ आदींची साक्ष महत्त्वपूर्ण ठरल्या.

एकंदरीत या खून खटल्यात निकालामध्ये परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांच्या साक्षीच्या आधारे गुन्हा सिद्ध झाल्याने न्या.एस.एन.राजूरकर यांच्या न्यायालयाने आरोपी प्रमोद शिंपी याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

मयताची आई निर्दोष मुक्त

जन्मठेप झालेल्या प्रमोद शिंपी याची प्रेयसी आणि मयत मुलाची आई मंगलाबाई हिची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ॲड. प्रदीप महाजन यांनी दोष सिद्धतेकरीता प्रभावी युक्तिवाद सादर केला. पैरवी अधिकारी म्हणून ताराचंद जावळे यांनी काम पाहिले तर पोलिस नाईक वासुदेव मराठे यांनी न्यायालयीन कामकाजासाठी त्यांना सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT