CRIME NEWS esakal
जळगाव

Jalgaon Crime News : जिल्‍हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

Latest Crime News : महाव्यवस्थापक चेतन पाटील यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा तपास उपविभागीय पोलिस अधीकारी संदिप गावीत करीत आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : तुम्ही सांगत असलेले संबंधित काम माझ्याकडे नसल्याचे सांगितल्याचा राग येऊन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन भा. पाटील यांनी उद्योग निरीक्षकाला जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी पाटील यांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (atrocity filed against General Manager of District Industry Centre)

याबाबत अनिल ज्ञानेश्वर गाढे यांनी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात नमुद केल्याप्रमाणे, ते जिल्हा उद्योग केंद्रात उद्योग निरीक्षक म्हणून नोकरीस आहेत. कार्यालयीन कामकाज करताता कार्यालयात सुरू असलेले अनेक गैरव्यवहार निदर्शनास आणल्या व वरिष्ठ कार्यालयात लेखी तक्रारी करण्यात आल्या होत्या.

तेव्हापासून महाव्यवस्थापक चेतन पाटील यांचा निरीक्षक गाढे यांच्यावर राग होता. परिणामी त्यांना अपमानास्पद वागणूक देत होते. १३ ऑगस्टला कार्यालयात माहिती अधिकाराच्या कामकाजासाठी काही लोकांचे शिष्टमंडळ आले होते. ते महाव्यवस्पकांना भेटल्यानंतर त्यांनी अनिल गाढे यांना भेटा, असे सांगत गाढे यांच्या टेबलावर पाठवले. (latest marathi news)

ते, तिघे गाढे यांच्याकडे गेले. परंतु, त्या कामाविषयीचे टेबल त्यांच्याकडे नसल्याचे त्यांनी संबंधितांना सांगितल्याने महाव्यवस्थापक पाटील यांचा पारा चढला व त्यांनी गाढे यांना जातीवाचक उद्देशाने बोलून अपमानीत केले.

गाढे यांनी याप्रकरणी आज शनिवारी (ता.२८) जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून महाव्यवस्थापक चेतन पाटील यांच्याविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा तपास उपविभागीय पोलिस अधीकारी संदिप गावीत करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT