With the suspects who smuggled Gavthi pistol and cartridges Superintendent of Police Dr. Maheshwar Reddy etc. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : नाकाबंदी तोडून पोलिसांवर हल्ला! 2 कर्मचारी जखमी

Jalgaon News : छत्रपती संभाजीनगरातील मूळ रहिवासी असलेल्या दोन गुन्हेगारांना पाच पिस्तूल, १० राउंड आणि कोयत्यासह चोपडा ग्रामीण पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : छत्रपती संभाजीनगरातील मूळ रहिवासी असलेल्या दोन गुन्हेगारांना पाच पिस्तूल, १० राउंड आणि कोयत्यासह चोपडा ग्रामीण पोलिसांनी अटक केली. मिळालेल्या माहितीवरून नाकाबंदी केली असता, पोलिसांच्या अंगावर वाहन घालून नाकाबंदी तोडून संशयित फरारी झाले. त्यांना पकडल्यावर पोलिसांच्या अंगावर धारदार कोयता उगारून हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सांगितले. (Jalgaon Crime)

जळगावच्या सीमेवरील उमर्टी येथून सत्रासेन, लासूर या गावांमार्गे तस्कर पिस्तूल घेऊन जाणार असल्याची माहिती चोपडा ग्रामीणच्या पोलिस निरीक्षक कावेरी कमलाकर यांना मिळाली. त्यांनी ही माहिती वरिष्ठांना कळविली. त्यावरून पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी, अप्पर अधीक्षक कविता नेरकर, उपअधीक्षक कुणाल सोनवणे.

पोलिस निरीक्षक कमलाकर यांच्या पथकातील शशिकांत पारधी, राहुल रणधीर, रावसाहेब पाटील, दीपक शिंदे, अभिषेक सोनवणे, आत्माराम अहिरे यांनी लासूर गावाजवळ नाकाबंदी केली. सातपुडा पर्वताकडून येणाऱ्या रस्त्यावर निळ्या रंगाची स्पोर्ट्‌स बाईक सुसाट येत होती. पोलिसांनी थांबविण्याचा इशारा केल्यावर दुचाकीस्वाराने थेट पोलिसांच्या अंगावर दुचाकी नेत चिरडण्याचा प्रयत्न केला.

तेथून निसटल्यावर पाठलाग करीत त्या दोघांना पुन्हा ताब्यात घेतले. त्यापैकी एकाने पाठीत हात घालत चक्क हातभर लांबीच्या कोयत्याने पोलिसांवर वार केला. कोयत्याचा हल्ला आणि झटापटीत दोन्ही पोलिस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत. या कारवाईत मोहम्मद लतीफ शेख सलीम (वय २४, रा. माणिकनगर, जि. छत्रपती संभाजीनगर) व इरफान खान अयुब खान (२३, रा. नारशेन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर) यांना अटक केली आहे. (latest marathi news)

जळगाव तस्करीचे केंद्र

अवघ्या आठ दिवसांपूर्वीच अजिंठा पोलिसांनी पुणे येथील एका तरुणाला लक्झरी बसमधून पिस्तूल घेऊन जाताना अटक केली. त्याच्यापाठोपाठ सोमवारी (ता. २९) पुन्हा छत्रपती संभाजीनगर येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याजवळील सॅकची झडती घेतली असता, त्यात १० हजार रुपयांची १० जिवंत काडतुसे, विशिष्ट बनावटीचा लोखंडी कोयता, दोन मोबाईल, स्पोर्ट्‌स बाईक, पाच गावठी कट्टे असा एकूण दोन लाख सहा हजार ९४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान

जिवाची पर्वा न करता संशयितांना पकडण्यात यश मिळविलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना तत्काळ पोलिस अधीक्षकांनी रोख बक्षीस देऊन सन्मानित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Rape News : कोल्हापुरात क्रुरतेचा कळस! विळ्याचा धाक दाखवत बापाकडून पोटच्या 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

Latest Marathi News Live Update : पर्यायी मार्गाचा वापर करा, वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे आवाहन

पावसाचं ठरलंय, थांबायचं नाही! कोकणसह मध्य महाराष्ट्र, विदर्भात अजून आठवडाभर जोरदार बरसणार

Panchang 26 October 2025: आजच्या दिवशी शिव सहस्त्रनाम स्तोत्र पठण व ‘सों सोमाय नमः’ या मंत्राचा जप करावा

सुबत्तेने लकवा भरलाय

SCROLL FOR NEXT