Officers and staff of Forest Department with seized timber. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : अवैध लाकूड वाहतूक प्रकरणी वन विभागाकडून एकाविरुद्ध गुन्हा

Jalgaon Crime : चोपडा तालुक्यातील अडावद वन परीक्षेत्रात अनगड प्रकाराच्या लाकडापासून बनविलेले लाटणे विक्रीसाठी अवैधरीत्या नेत असताना वन विभागाने पकडले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : चोपडा तालुक्यातील अडावद वन परीक्षेत्रात अनगड प्रकाराच्या लाकडापासून बनविलेले लाटणे विक्रीसाठी अवैधरीत्या नेत असताना वन विभागाने पकडले. या कारवाईत सुमारे पंधरा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत वन विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वन कर्मचारी गुरुवारी (ता. १४) घटनास्थळावर गेले असता तेथे मोटारसायकलवर दोन गोण्यांसह एक व्यक्ती दिसला. (Jalgaon Crime case filed by forest department against one in connection with illegal timber transportation)

त्याचा पाठलाग केला असता, तो मुद्देमाल व मोटारसायकल जागेवर सोडून जंगलाच्या दिशेने पळून गेला. गोण्या तपासल्या असता त्यात अनगड प्रकारातील लाकडापासून तयार केलेले ३१० लाटणे आढळून आले. याची किंमत वीस रुपये प्रमाणे ६ हजार २०० तसेच मोटारसायकल किंमत ९ हजार रुपये एकूण माल असा वाहनासह १५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल अडावद क्षेत्र येथे जमा करण्यात आला आहे.

या प्रकरणी वन कायद्यांतर्गत वनपाल कुंड्यापाणी यांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई वनपरीक्षेत्र अधिकारी प्रशांत साबळे.

वनपाल कुंड्यापाणी भावना चव्हाण, वनपाल योगेश साळुंखे, वनरक्षक नवल चव्हाण, समीर तडवी, इंद्रसिंग पावरा यांनी केली. उपवनसंरक्षक यावल जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली कुंड्यापाणी वनपाल तपास करीत आहे.

जनतेने अवैध लाकूड वाहतूक व वनउपज शिकार जर होत असली तर १९२६ या टोल फ्री क्रमांकावर कळवावे व नजीकच्या वन परीक्षेत्राधिकारी कार्यालय येथेही कळवावे, असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT