Crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : 30 कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल; धरणगावातील प्रकार

Jalgaon Crime : निवडणुकीच्या कामावर गैरहजर राहिलेल्या एकूण ३० कर्मचाऱ्यांविरुद्ध धरणगाव पोलिस ठाण्यात कामात कुचराई केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : निवडणुकीच्या कामावर गैरहजर राहिलेल्या एकूण ३० कर्मचाऱ्यांविरुद्ध धरणगाव पोलिस ठाण्यात कामात कुचराई केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईनंतर कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत जळगाव ग्रामीणचे निवडणूक नायब तहसीलदार दिगंबर भिकन जाधव यांनी फिर्यादद दिली आहे. त्यानुसार बांभोरी शिवारातील कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात गेल्या १२ मे रोजी नियुक्त कर्मचारी यांना निवडणुकीचे साहित्य घेण्यासाठी बोलविण्यात आले होते. (Jalgaon Crime Case registered against 30 employees )

साहित्य घेऊन कर्मचारी व अधिकारी रवाना झाले होते. मात्र, त्यापैकी काही जण प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर हजर नव्हते. सदर कर्मचारी १२ मे रोजी नियुक्त करण्यात आलेल्या ठिकाणी गैरहजर होते. यासाठी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, जळगाव ग्रामीणचे सहाय्यक निवणूक निर्णय अधिकारी, जिल्हाधिकारी भूसंपादन यांची कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नव्हती.

त्यामुळे लोकप्रिनिधित्व अधिनियम १९५१चे कलम १३५अन्वये निवडणूक कर्तव्यात टाळाटाळ करणे, नेमलेल्या ठिकाणी गैरहजर राहणे त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जळगाव ग्रामीणचे सहाय्यक निवडणूक अधिकारी यांच्या आदेशाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सचिन शिरसाठ व त्यांचे सहकारी करीत आहेत.

गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे

गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये मतदान केंद्राध्यक्ष (पीआरओ) प्रशांत सुभाष शेलाई, गणेशपूर (ता. चाळीसगाव), सुनील दिनकर चाऊक (मांडळ ता. अमळनेर), दीपक गणपत आवटे (चाळीसगाव), शेख अजमोद्दिन शेख जैनोद्दिन (भडगाव), विलास गोकुळ पाटील (सावखेडे ता. पारोळा), जितेंद्र बाबुलाल पाटील (कळवण तांडा ता. भडगांव), रमेश यादव पाटील (जळगाव), घनश्याम मगन ईसई (वडगाव ता. पाचोरा), भगवान भिका सुरवाडे (अमळनेर), विलास यादव नेरकर (बदरखे तांडा ता. पाचोरा)

नागसेन जालम बागुल (पारोळा), किरण पोपट महाजन (चाळीसगाव), विजय दगा पाटील (राजदेहरे सेत ता. चाळीसगाव), गुलाबराव किसन चव्हाण (सार्वे पिंप्री ता. पाचोरा), संजीव यशवंत नागरे (राजदेहरे तांडा ता. चाळीसगाव), नरेंद्र शंकर जोशी (पाचोरा), मतदान अधिकारी १ (एफपीओ) प्रमोद दत्तात्रय पाठक (एरंडोल), सतीश पतंगराव पाटील (देवळी ता. चाळीसगाव), राजू उत्तम राठोड (पाचोरा), रमेश मोहन पाटील (हिरापूर ता. चाळीसगाव), रवींद्र रामराव देवकर (दहीवद ता. चाळीसगाव)

मतदान अधिकारी २ (ओपीओ) संजय उत्तम पाटील (पाचोरा), रणधीर सीताराम वाघ (जळगाव), राकेश गणपत कंजरभाट (जळगाव), सुनील नानू नगराळे, विजय नाना पाटील (अमळनेर), अजित तानसिंघ चव्हाण (भडगाव), भाऊसाहेब विश्वास पाटील (महीदळे ता. भडगाव), राहुल बाळू भामरे (अंतुर्ली ता. पाचोरा), विजय साहेबराव घोडेस्वार (बहाळ ता. चाळीसगाव), गणेश सदाशिव सोनार (जळगाव) या कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest Updates: नेपाळमध्ये हिंसाचाराचा भडका ! भारताने विमान, रेल्वे सेवा केली स्थगित, नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

Archery World Championship 2025 : भारतीय महिला तिरंदाजांचा ब्राँझपदकासाठी लढा; दक्षिण कोरियाशी लढत

भरदिवसा घरफोडी! 'वहागावात साडेचार तोळे दागिन्‍यांसह ३५ हजारांची रोकड लंपास'; वाई तालुक्यात भीतीचे वातावरण

Latest Marathi News Updates : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक

Asia Cup 2025 : सामना अमिरातीबरोबर, पण तयारी पाकविरुद्धची; आशिया चषक स्पर्धेत आजपासून भारताची मोहिम

SCROLL FOR NEXT