beating esakal
जळगाव

Jalgaon Crime News : शेळ्या शेतात घुसल्याचा जाब विचारणाऱ्या शेतकऱ्यास मारहाण

Jalgaon Crime : तालुक्यातील अट्रावल शिवारातील केळीच्या शेतात मंगळवारी (ता. ११) दुपारी शेळ्या शिरल्या व त्यांनी केळी पिकाचे नुकसान केले.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : तालुक्यातील अट्रावल शिवारातील केळीच्या शेतात मंगळवारी (ता. ११) दुपारी शेळ्या शिरल्या व त्यांनी केळी पिकाचे नुकसान केले. याबाबत शेतकऱ्याने गुरख्यास व्यवस्थित चराई करा, अशा बोलण्याचा राग आल्याने गुरख्यासह तिघांनी शेतकऱ्यास मारहाण केली. तसेच, त्याच्या डोक्यात काठीने वार करीत जबर दुखापत केली. यात शेतकरी गंभीर असून, त्याच्यावर यावलला प्रथमोपचार करून जळगावात हलविण्यात आले आहे. ()

अट्रावल (ता. यावल) येथील शेतकरी रवींद्र पंडित कोळी (वय ४९) यांचे गावालगत शेत आहे. या शेतात त्यांनी केळी लागवड केली. या शेतात मंगळवारी दुपारी शेळ्या शिरल्या व त्यांनी केळीचे नुकसान केले. शेतकऱ्याने या शेळ्या बाहेर काढून गुरखा शुभम प्रदीप कोळी व त्याच्यासोबत असलेल्या इतर दोघांना शेळ्या व्यवस्थित चराई करा, असे सांगितले.

या बोलण्याचा राग आल्याने तिघांनी शेतकरी रवींद्र कोळी यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यांच्या डोक्यात काठीने वार करीत जबर दुखापत केली. जखमी अवस्थेत कोळी यांना यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Metro Fare Hike: प्रवाशांचा खिसा रिकामा होणार? मेट्रोवर भाडेवाढची शक्यता, केंद्राकडे प्रस्ताव पाठविला, कोणत्या मार्गांवर होणार परिणाम?

Midday Meal Rice Theft : माध्यान्ह पोषण आहाराचा तांदूळ चोरून नेत होते, ग्रामस्थांनी ट्रक अडवला अन्; मुख्याध्यापकचं निघाला चोरटा

Manoj Jarange: मनोज जरांगे यांच्या खूनासाठी अडीच कोटींची डिल? धनंजय मुडेंचे नाव घेत केला घटनाक्रम उघड, कोण आहे PA कांचन?

Latest Marathi News Live Update :तुम्हाला नाक घासायला लावेन हे लक्षात ठेवा, मनोज जरांगेंचा इशारा

iPhone Air ला टक्कर द्यायला आला रीयल किंग? 'या' कंपनीने लॉन्च केला सर्वांत स्लिम 5G मोबाईल, किंमत एवढी कमी की बघताच खरेदी कराल

SCROLL FOR NEXT