Jalgaon Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : ट्रॅक्टर न दिल्यावरून तरवाडेत बापलेकास मारहाण

Jalgaon News : ट्रॅक्टर न दिल्याकारणावरून तरवाडे (ता. चाळीसगाव) येथे नऊ जणांनी बापलेकास जबर मारहाण केली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : ट्रॅक्टर न दिल्याकारणावरून तरवाडे (ता. चाळीसगाव) येथे नऊ जणांनी बापलेकास जबर मारहाण केली. तरवाडे (ता. चाळीसगाव) ज्ञानेश्वर आनंदा शिंदे यांच्याकडे ट्रॅक्टर, दोन ट्रॉली, तसेच मशागतीचे साहित्य असून, ते लोकांना गरज भासल्यास साहित्य देतात. जनार्दन शिवाजी कोळी, विठ्ठल नारायण कोळी. (father and son beaten up in tarwade for not giving tractor)

जगदीश अभिमन कोळी यांना एक-दोन वेळा त्यांनी ट्रॅक्टर व अवजारे न दिल्याने वाद झाला होता. शनिवारी (ता. २०) रात्री साडेनऊच्या सुमारास ज्ञानेश्‍वर शिंदे शेतात गुरांना चारा टाकण्यासाठी गेले असता, जनार्दन कोळी, विठ्ठल कोळी व जगदीश कोळी अनधिकृतपणे शेतात आले व ‘तुझ्या मुलाने ट्रॅक्टर घेऊन जा’, असे सांगितले आहे, म्हणून ‘आम्ही तुझे ट्रॅक्टर घेण्यासाठी आलो आहोत’, असे सांगितले.

त्यावर ज्ञानेश्‍वर शिंदे यांनी मुलगा पंकज याला फोन केला व त्यालाही शेतात बोलावले. त्यावर तो ‘मी असे काहीच बोललो नाही’, असे सांगू लागताच जनार्दन कोळी व जगदीश कोळी यांनी ज्ञानेश्‍वर व पंकज शिंदे यांना शिवीगाळ केली. त्याचा जाब विचारताच विठ्ठल कोळी याने शिवाजी ओंकार कोळी, भगवान नारायण कोळी, अनिल नारायण कोळी, विशाल विठ्ठल कोळी, योगेश विठ्ठल कोळी. (latest marathi news)

भूषण विठ्ठल कोळी यांना बोलावले व या सर्वांनी मारहाण केली. ज्ञानेश्‍वर शिंदे व पंकज शिंदे यांना दुचाकीच्या शॉकपसह लाकडी दांडका मारून गंभीर जखमी केले. या मारहाणीत पंकज बेशुद्ध पडला. अखेर ज्ञानेश्‍वर शिंदे यांनी अरुण पावले, दीपक पवार, सचिन जाधव आदींना बोलावले व त्यांनी मारहाण करणाऱ्यांच्या ताब्यातून सोडविले.

जखमींवर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले. ज्ञानेश्‍वर शिंदे यांच्या फिर्यादीवरून संशयित जनार्दन कोळी, विठ्ठल कोळी, जगदीश कोळी, शिवाजी कोळी, भगवान कोळी, अनिल कोळी, विशाल कोळी, योगेश कोळी, भूषण कोळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT