Gutkha seized by the Food and Drug Administration Department in Nashirabad, officials from the action team.
Gutkha seized by the Food and Drug Administration Department in Nashirabad, officials from the action team. esakal
जळगाव

Jalgaon Crime News : नशिराबादमधून 50 लाखांचा गुटखा जप्त

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : शहरासह जिल्ह्यात गुटख्याची सर्रास विक्री होत आहे. जिल्ह्यातील काही तालुके, शहरे गुटखा साठवणूक, विक्रीची मोठी केंद्रे बनली असून गुटखा माफियांची मुजोरी वाढल्याच्या पार्श्‍वभूमीवर गुप्त माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाने नशिराबाद येथे केलेल्या कारवाईत तब्बल ५० लाखांचा गुटखा तसेच वाहन, असा सुमारे ६० लाखांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी संशयितांना ताब्यात घेऊन मोठा साठा हस्तगत केला आहे. (Jalgaon Crime Gutkha worth 50 lakh seized from Nashirabad)

जळगाव जिल्हा गुटखा तस्करीचे मोठे केंद्र बनले आहे. अमळनेर, चाळीसगाव, पाचोरा, चोपडा ही गुटखा साठवणूक, विक्री, वाहतुकीची मोठी ठिकाणे आहेत. त्यातच आता भुसावळ, जळगाव शहरातही गुटखा व्यावसायिकांचे जाळे वाढले आहे.

गुप्त माहितीद्वारे कारवाई

अन्न् व औषध प्रशासनाचे गुप्तवार्ता विभागास नशिराबाद परिसरात राज्यात बंदी असलेला पान मसाला व सुगंधित तंबाखूचा साठा चोरट्या पद्धतीने वाहतूक व विक्रीचा व्यवसाय एका गुदामातून चालत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली.

त्यानुसार प्रशासनाच्या गुप्तवार्ता पथकाने सापळा रचून नशिराबाद येथील जय मुंजोबा पेपर बोर्ड कारखान्यामागील बाजूस असलेल्या गुदामावर छापा घातला. त्यावेळी एका वाहनातून राज्यात बंदी असलेला पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा गुदामात उतरवत असताना मिळून आला.

४८ लाखांचा माल जप्त

प्रशासनाचे अधिकारी यांनी कारवाई करत सुमारे ४८ लाख २७ हजार ९०० रुपये इतक्या किमतीचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा, वाहन किंमत सुमारे १० लाख रुपये मात्र असा एकूण ५८ लाख २७ हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला. साठा आढळलेले गुदाम पुढील तपासाच्या दृष्टीने सील केले आहे.

याप्रकरणी गुदामात आढळलेले संशयित मिथुन कुमार साहनी, अजयकुमार साहनी (दोघे रा. बिहार), फरार वाहन चालक अब्दुल झहीर खान (रा. खरजना, इंदूर), वाहन मालक बलविर सिंह बग्गा (रा. इंदूर), क्रेटा वाहन वाहनातून फरार झालेला मामा (पूर्ण नाव उपलब्ध नाही) नामक मॅनेजर तसेच जागा मालक व साठामालक यांच्याविरोधात नशिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. मुख्य साठा मालक, पुरवठादार यांचा शोध घेणे तसेच गुन्ह्यात सहभागी छुपे भागीदार यांचा तपास सुरु आहे.

यांच्या पथकाने केली कारवाई

ही कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागच्या राज्याचे गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख राहुल खाडे, मुंबई व नाशिक विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश दाभाडे, यदुराज दहातोंडे, संदीप सूर्यवंशी, शरद पवार यांच्या संपूर्ण पथकाने केली. अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Result 2024: लोकसभा निवडणुकीचा निकाल कधी अन् कुठं पाहणार, जाणून घ्या एका क्लिकवर

Share Market: लोकसभा निवडणूक निकालाच्या दिवशी कसा असतो शेअर बाजार? तेजी येईल की घसरण होईल?

Hajipur Lok Sabha Result: वर्चस्वाच्या लढाईत वडिलांची जागा राखण्याचे चिराग यांच्यासमोर आव्हान

Pune Lok Sabha: पुण्यात भाजप-काँग्रेसकडून जल्लोषाची लगबग; पेढे, लाडू अन् गुलालाची फुल्ल ऑर्डर

Shripad Joshi: बारावीपर्यंत मराठी कम्पलसरी करायला टाळाटाळ का? साहित्यिक श्रीपाद जोशींचा सवाल

SCROLL FOR NEXT