Crime  esakal
जळगाव

Jalgaon Crime News : 10 लाखांच्या मागणीसाठी जळगावच्या विवाहितेचा छळ

Jalgaon Crime : १० लाखांची मागणी करत मारहाण करत छळ केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime : पिंप्राळा येथील माहेर असलेल्या विवाहितेला सासरी मेहुणबारे येथे १० लाखांची मागणी करत मारहाण करत छळ केल्याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूनम मनोज चिंचोले (वय ३०) या महिलेचे माहेर पिंप्राळा (जळगाव) येथील असून तिचा विवाह चाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे येथील मनोज रमेश चिंचोले यांच्याशी रितीरिवाजानुसार झाला आहे. (Jalgaon Crime)

लग्नानंतर सुरवातीचे दिवस चांगले गेल्यानंतर विवाहितेला माहेराहून १० लाख रूपये आणावे अशी मागणी केली. विवाहितेने माहेराहून पैसे आणले नाही याचा राग येवून पती मनोज चिंचोले याने विवाहितेला मारहाण करण्यास सुरवात केली.

त्यानंतर सासू, सासरे, जेठ, जेठाणी, नणंद, नंदोईभाऊ आणि चुलत सासरे यांनी देखील शारिरीक व मानसिक छळ केला. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी पिंप्राळा येथे निघून आल्या.

दहा जणांवर गुन्हा

गुरूवारी (ता.१८) रामानंद नगर पोलिस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती मनोज रमेश चिंचोले, सासरे रमेश दामोदर चिंचोले, सासू पुष्पा रमेश चिंचोले, जेठ पंकज रमेश चिंचोले, जेठाणी रोहिणी पंकज चिंचोले, नणंद दीपाली खेमराज दशपुते, नंदोई खेमराज भटू दशपुते.

चुलत सासरे डिगंबर दामोदर चिंचोले, विलास दामोदर चिंचोले आणि जनार्दन काशिनाथ झोडगे सर्व रा. मेहुणबारे ता. चाळीसगाव यांच्या विरोधात रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ भूषण जैतकर हे करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Conflict : इराणचा युद्धबंदीच्या चर्चांना नकार ! अमेरिकेला ठाम इशारा – गरज असेपर्यंत युद्ध सुरूच राहणार

Islapur Fire Incident: ईस्लापूरमध्ये भीषण आग; हॉटेल, हार्डवेअर व शूज सेंटरचे लाखोंचे नुकसान

आरोग्यमंत्र्यांच्या माहितीचा बुरखा टराटरा फाटला, घाटीमध्ये रेबीजच्या लसीचा तुटवडा; रुग्णांना मोठा भुर्दंड

Nashik Sharda Sanman: शारदानगरमध्ये ‘शारदा सन्मान पत्र’ प्रदान; महाराष्ट्रातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव; कल्याण पाचांगणे

Latest Marathi Update : राज्यात मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT