Crime esakal
जळगाव

Jalgaon News : शनिपेठ पोलिसांची तिहेरी कामगिरी; 2 वर्षापासून फरार चोरटा मुद्देमालासह जेरबंद

Jalgaon News : शनिपेठ पोलिस ठाण्यातील गुन्हेशोध पथकाने एकाच दिवसात तीन गुन्हे उघडकीस आणून संशयीतांना बेड्या ठोकल्या.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon News : शनिपेठ पोलिस ठाण्यातील गुन्हेशोध पथकाने एकाच दिवसात तीन गुन्हे उघडकीस आणून संशयीतांना बेड्या ठोकल्या.

शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या गुन्हेशोध पथकाने तीन गुन्ह्यांतील संशयीतांना एकाच दिवशी गजाआड करून तिहेरी कामगिरी केली.

फरार भोंदू अटकेत

आसोदा रोड परिसरात २६ जानेवारी २०२२ ला छाया रतन बाविस्कर या महिलेच्या घरी पूजेसाठी आलेल्या भोंदूबाबाने वास्तुदोष काढण्याच्या बहाण्याने सोन्याचे मंगळसूत्र व कानातील सोन्याचे दागिणे लंपास केले होते.

या गुन्ह्यातील दोन वर्षापासून फरार भोंदू हरीश ऊर्फ हरी गुलाब गदाई (रा. देवगाव राजापूर) हा पहुर ता.जामनेर येथे असल्याची माहितीवरून उपनिरीक्षक योगेश ढिकले, सहाय्यक फौजदार हरीश जाधव, राहुल पाटील, अनिल कांबळे आणि भागवत शिंदे यांच्या पथकाने काल रविवार (ता.१८) अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीचा ऐवज हस्तगत केला.

पिस्तूलधारी अटकेत

शहरातील काशीबाई उखाजी कोल्हे शाळेमागील परिसरात एक जण हातात पिस्तूल घेत दहशत करणाऱ्या ईश्वर रामा पारधी (वय २३ धानोरा ता.जळगाव) याला गावठी पिस्तूलसह अटक केली. गुन्हेशोध पथकाने रविवार (ता.१८) सायंकाळी पोलिस नाईक राहुल पाटील यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरफोडी उघडकीस

कांचन नगर परिसरातील संजय केशवराव मोहिते (वय ६१) मागील आठवड्यात ११ ते १३ फेब्रुवारी दरम्यान देवदर्शनाला उज्जैन येथे गेले असताना त्यांच्या बंद घराच्या दाराच्या कडी कोयंडा तोडून चोरट्यांनी ऐवज चोरला होता. पोलिसांनी या प्रकरणात संशयित शुभम दिलीप सोनवणे (रा. कांचन नगर) याच्यासह एक विधीसंघर्षीत बालकाला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तू I Love You म्हणाली नाहीस? प्राध्यापकाने भरवर्गात केलं प्रपोज, वाटायला चॉकलेट्सही आणली; विद्यार्थीनीने...

Fuel Storage: भारतात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा किती दिवसांचा साठा शिल्लक आहे? केंद्र सरकारने आकडा सांगून विषयच संपवला!

"तेव्हा माझ्यातला नवरा पुढे आला" उमेशने शेयर केला पुन्हा प्रियासोबत नव्या वेबसिरीजमध्ये काम करण्याचा अनुभव

Numerology : 'या' 3 महिन्यात जन्मलेली व्यक्ती असते सगळ्यांची लाडकी; एका इशाऱ्यावर लोक त्यांच्यासाठी काहीही करतात

Farmer News : शेतकऱ्याचा जीव 'मुठीत' अन् वीज 'रात्री'त! माहूर तालुक्यात महावितरणच्या धोरणामुळे बळीराजा मृत्यूच्या छायेत.

SCROLL FOR NEXT