Crime News esakal
जळगाव

Jalgaon Crime News : महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; रामानंदनगर पोलिसांत तक्रार दाखल

Crime News : वीजपुरवठा खंडित केल्यावरून हरिविठ्ठलनगरातील एकाने बेदम मारहाण करून कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना बुधवारी (ता. २२) रात्री पाऊणला घडली.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : महावितरण कंपनीचे गिरणा पंपींग उपकेंद्रांतर्गत महाबळ येथील कार्यालयातील कर्मचाऱ्याला वीजपुरवठा खंडित केल्यावरून हरिविठ्ठलनगरातील एकाने बेदम मारहाण करून कार्यालयावर दगडफेक केल्याची घटना बुधवारी (ता. २२) रात्री पाऊणला घडली. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. (Jalgaon Crime mahavitaran employee assaulted )

गिरणा पंपींग रोडवरील महावितरण कंपनीचे उपकेंद्रांतर्गत महाबळला कार्यालय आहे. या ठिकाणाहून खंडेरावनगर, हरिविठ्ठलनगर, वाघनगर, रामानंदनगर, समतानगरात वीजपुरवठा केला जातो. बुधवारी (ता. २२) रात्री पाऊणला हरिविठ्ठलनगरमधील दीपक सपकाळे यांच्यासह एक जण, असे दोघे महाबळ कार्यालयात आले.

त्या ठिकाणी कर्मचारी किरण दत्तात्रय सपकाळे (रा. दादावाडी) कामावर हजर होते. दरम्यान, दीपक सपकाळे तेथे येऊन कर्मचारी किरण सपकाळे यांना लाईट चालू, बंद का करतो, असे बोलून कार्यालयात ओढून बेदम मारहाण केली. कार्यालयाबाहेर येऊन दोघांनी कार्यालयावर दगडफेक केली व निघून गेले. (latest marathi news)

दरम्यान, ही घटना घडल्यानंतर सकाळी अकराला महावितरण कंपनीच्या विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे. मारहाण करणाऱ्यांविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest Updates: नेपाळमध्ये हिंसाचाराचा भडका ! भारताने विमान, रेल्वे सेवा केली स्थगित, नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

Archery World Championship 2025 : भारतीय महिला तिरंदाजांचा ब्राँझपदकासाठी लढा; दक्षिण कोरियाशी लढत

भरदिवसा घरफोडी! 'वहागावात साडेचार तोळे दागिन्‍यांसह ३५ हजारांची रोकड लंपास'; वाई तालुक्यात भीतीचे वातावरण

Latest Marathi News Updates : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक

Asia Cup 2025 : सामना अमिरातीबरोबर, पण तयारी पाकविरुद्धची; आशिया चषक स्पर्धेत आजपासून भारताची मोहिम

SCROLL FOR NEXT