Bribe Crime esakal
जळगाव

Jalgaon Bribe Crime : सातबाऱ्यावर आईचे नाव लावण्यासाठी लाच घेताना मंडलाधिकाऱ्याला अटक

Crime News : मंडलाधिकारी किरण खंडू बाविस्कर यांनी तक्रारदाराकडून सुरवातीला दहा हजार रुपयांची मागणी केली होती.

सकाळ वृत्तसेवा

जळगाव, ता. ६ ः सात बारा उताऱ्यावर वडिलांसह आते भावाचे नाव कमी करून आईचे नाव लावण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारणाऱ्या मंडलाधिकारी किरण खंडू बाविस्कर याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली. जळगावातील तक्रारदाराने सात बारा उताऱ्यावर वडिलांसह आते भावाचे नाव कमी करून आईचे नाव लावण्यासाठी पिंप्राळा कार्यालयात अर्ज केला होता. मंडलाधिकारी किरण खंडू बाविस्कर यांनी तक्रारदाराकडून सुरवातीला दहा हजार रुपयांची मागणी केली होती. (Jalgaon crime Mandal officer arrested for accepting bribe)

तडजोडीअंती एसीबी पथकाने पंचासमक्ष केलेल्या पडताळणीत पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्यासह पथकातील उपनिरीक्षक दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, राकेश दुसाने, एन. एन. जाधव, उपनिरीक्षक सुरेश पाटील, रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे यांनी सापळा रचून मंडलाधिकारी किरण बाविस्कर यांनी पाच हजारांची रक्कम स्वीकारताच ताब्यात घेतले. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT