crime esakal
जळगाव

Jalgaon Crime News : नंदगावात 2 गटांत घमासान; लोखंडी रॉड, दगडासह तुफान हाणामारी

Jalgaon Crime : दोन्ही गटातील जखमींनी दिलेल्या तक्रारींवरून परस्पर विरुद्ध दंगलीचे गुन्हे जळगाव तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

Jalgaon Crime News : नंदगाव (ता. जळगाव) येथे पूर्ववैमनस्यातून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. दोन्ही गटातील जखमींनी दिलेल्या तक्रारींवरून परस्पर विरुद्ध दंगलीचे गुन्हे जळगाव तालुका पोलिस ठाण्यात दाखल झाले आहे. २८ संशयितांचा शोध घेऊन अटकसत्र राबविले जात आहे. नंदगाव येथे बुधवारी (ता. ३) सायंकाळी जुन्या भांडणावरून दोन गटांत तुफान हाणामारी झाली. दोन्ही गटांतील ४ गंभीर जखमी झाले असून, जखमींवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Nandgaon two groups clashed with iron rods and stones )

पहिल्या गटातील रत्नाबाई रामनाथ पाटील (वय ४०) यांच्या फिर्यादीनुसार, कल्पेश लक्ष्मण सोनवणे, रिंकू प्रकाश सोनवणे, रितेश प्रकाश सोनवणे, विशाल मधुकर सोनवणे, आकाश मधुकर सोनवणे, सनी राजेंद्र सोनवणे, कृष्ण राजेंद्र सोनवणे, धनराज गेंदा सोनवणे, तुषार कृष्णा सोनवणे, नितीन सोपान सोनवणे, भावेश लक्ष्मण सोनवणे आणि मुरलीधर धनराज सोनवणे यांच्याविरुद्ध रात्री एकला दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. तर दुसऱ्या गटातील जखमी मुरलीधर धनराज सोनवणे यांच्या तक्रारीनुसार, प्रशांत संभाजी पाटील याने शेतरस्त्यावरून माझ्याशी वाद घातला.

त्यावरून मारहाण केल्याप्रकरणी भूषण गुणवंतराव पवार, रामनाथ पंडित पाटील, राज रामनाथ पाटील, वीरेंद्र पांडुरंग पाटील, प्रशांत संभाजी पाटील, ओम लालू पाटील, वैभव सुनील पाटील, श्रीराम पंडित पाटील, ज्ञानेश्वर हरी पाटील, राहुल विश्वनाथ पाटील, दीपक काशीनाथ पाटील, गुलाब आधार पाटील, जिजाबराव काशीनाथ जाधव, राजेंद्र बापू पाटील, वसंत पंडित पाटील आणि भाऊसाहेब पितांबर पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक दीपक चौधरी तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal : अंगावर धावणे महागात पडले, ICCची यशस्वी जैस्वालवर कारवाई! ५ सामन्यांची बंदी की आणखी काही? नेमका काय निर्णय घेतला...

ती गोष्ट घडली आणि लता मंगेशकर यांनी रागात थेट CID च्या निर्मात्यांनाच केलेला फोन केला, इन्स्पेक्टर दयाने सांगितला किस्सा

Nigdi Chakan Metro : भोसरीतील उड्डाणपूल पाडण्यावरून राजकीय मौन; निगडी-चाकण मेट्रो ‘डीपीआर’ला मंजुरीची प्रतीक्षा

Marathi News Live Updates : अमरावतीतील नवजात बालकांच्या मृत्यू प्रकरणात आरोग्य सचिवांच्या नेतृत्वात समिती नेमणार : आरोग्यमंत्री आबिटकर

Bank Strike: सलग 5 दिवस बँका बंद? सप्टेंबरमध्ये पुन्हा संप; पाहा ताजी अपडेट

SCROLL FOR NEXT